डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचा सराव

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पणजी : स्पॅनिश सर्जिओ लोबेरा यांना एफसी गोवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून डच्चू देण्यात आल्यानंतर, संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पुढील सामन्यानिमित्त प्रभारी प्रशिक्षक डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर संघाचे रविवारी सराव सत्र झाले.

पणजी : स्पॅनिश सर्जिओ लोबेरा यांना एफसी गोवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून डच्चू देण्यात आल्यानंतर, संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पुढील सामन्यानिमित्त प्रभारी प्रशिक्षक डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर संघाचे रविवारी सराव सत्र झाले.

एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने शुक्रवारी (ता. ३१) लोबेरा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर शनिवारी (ता. १) शिक्कामोर्तब केले. त्यानंतर एफसी गोवाचे तांत्रिक संचालक असलेले डेरिक यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हैदराबाद एफसी संघाविरुद्ध बुधवारी (ता. ५) खेळला जाणार आहे. एफसी गोवाचे सध्या १५ सामन्यातून ३० गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एटीके एफसीचेही ३० गुण असून गोलसरासरीवर कोलकात्याचा संघ अव्वल स्थानी आहे.

चर्चिल ब्रदर्सचा धडाक्यासमोर नेरोका निष्प्रभ

एफसी गोवा संघव्यवस्थापनाने लोबेरा, तसेच त्यांचे सहाय्यक जेझूस टाटो व मान्युएल सायाबेरा यांच्या करारासह पूर्णविराम दिला आहे. एफसी गोवा संघ व्यवस्थापनाचा निर्णय मान्य करताना लोबेरा, टाटो व सायाबेरा यांनी आपण नाखुष असल्याचे प्रतिक्रिया दिली आहे.

लोबेरा यांनी २०१७-१८ मोसमात एफसी गोवा संघाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने त्या मोसमात उपांत्य फेरी गाठली. गतमोसमात (२०१८-१९) आयएसएल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले, तर सुपर कप जिंकून संघाला पहिला करंडक प्राप्त करून दिला. एकंदरीत लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघ आयएसएल स्पर्धेत ५६ सामने खेळला. संघाने २९ सामने जिंकले, ११ सामने बरोबरीत राहिले, तर १६ पराभव पत्करावे लागले.

 या कालावधीत संघाने ११६ गोल नोंदविताना ७५ गोल स्वीकारले. एका प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक गोल नोंदविण्याचा पराक्रम एफसी गोवा संघाने बजावला आहे. एफसी गोवा संघाच्या पाठीराख्यांनी रविवारी लोबेरा यांना निरोप दिला. यावेळी चाहत्यांना, तसेच लोबेरा यांना अश्रू रोखणे कठीण गेले.
 

संबंधित बातम्या