कोरोनामुळे ‘आयएसएल’चा अंतिम सामना होणार प्रेक्षकाविना

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पणजी: गोव्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संशयितांची तपासणी झालेली आहे. पण, रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारी घेत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील फातोर्ड्यात होणारा अंतिम सामना प्रेक्षकांबंद दरवाज्याआड खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पणजी: गोव्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संशयितांची तपासणी झालेली आहे. पण, रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारी घेत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील फातोर्ड्यात होणारा अंतिम सामना प्रेक्षकांबंद दरवाज्याआड खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माजी विजेते कोलकात्यातील ‘एटीके’ एफसी आणि ‘चेन्नईयीन’ एफसी यांच्यातील ‘आयएसएल’ फुटबॉल स्पर्धेतील सहाव्या मोसमातील अंतिम सामना शनिवारी (ता. १४) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. देशातील कोरोना विषाणू संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेत, स्पर्धेचे आयोजक असलेल्या फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांनी ‘कोव्हिड-१९’ सदर्भात खबरदारी घेण्याचे ठरविले आहे आणि त्यामुळेच सामना बंद दरवाजाआड म्‍हणजेच प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय आयोजकांनी गुरुवारी घेतला.

अंतिम सामन्याची ऑनलाईन तिकीट विक्री अगोदरच सुरू झाली होती. ज्यांनी अंतिम सामन्याची तिकिटे विकत घेतलेली आहेत, त्यांचे पैसे परत करण्याचेही ‘एफएसडीएल’ने ठरविले आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.

प्रथमच रिकाम्या स्टेडियमवर सामना

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची प्रेक्षक क्षमता सुमारे साडेअठरा हजारांची आहे. गेल्या शनिवारी (ता. ७ मार्च) एफसी गोवा आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात झालेल्या प्ले-ऑफ फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील लढतीत या स्टेडियमवर १८ हजार २६३ फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. ‘आयएसएल’ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच रिकाम्या स्टेडियमवर फुटबॉल सामना खेळला जाईल. गोव्यात २०१५ नंतर यंदा दुसऱ्यांदा ‘आयएसएल’ स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे.

संबंधित बातम्या