अखेर राष्ट्रध्वजासाठी शंभरफूटी हायमास्ट खांब उभारलाच.

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मुरगाव:वास्कोत अखेर राष्ट्रध्वजासाठी शंभरफूटी हायमास्ट उभारलाच
राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी वास्को पोलिसांनी बेवारस तक्रारीच्या विरोध केला. परंतु शहर नगरसेवक दाजी साळकर आणि त्यांचे देशाभिमानी साथीदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी राष्ट्रध्वजाचा हायमास्ट उभारण्यास परवानगी दिली. त्यामुळे सकाळी शंभरफूटी राष्ट्रध्वजाचा हायमास्ट खांब जोशी चौकात दिमाखात उभारण्यात आला.

शहर नगरसेवक दाजी साळकर यांनी भारतीय रेल्वेकडे पत्रव्यवहार करून वास्को रेल्वे स्टेशन समोरील जोशी चौकात शंभर फूट उंच हायमास्टवर राष्ट्रध्वज उभारावा अशी मागणी केली होती. श्री. साळकर यांच्या मागणीची दखल घेऊन रेल्वेने प्रस्ताव मान्य करून ध्वज उभारण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार काल बुधवारी हायमास्ट खांब उभारण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. शंभर फूट खांब जुळून झाल्यावर तो उभारण्याची तयारी सुरू झाली असताना वास्को पोलिसांनी राष्ट्रध्वजाचा खांब उभारण्यास हरकत घेऊन काम बंद पाडले होते. कोणीतरी बेवारस तक्रार केल्याचे पोलिसांनी या वेळी राष्ट्रभिमानी नागरिकांना सांगितले. पण ती तक्रार करणारी व्यक्ती कोण हे मात्र शेवटपर्यंत पोलिसांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे.
दरम्यान, नगरसेवक दाजी साळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा शंभर फूटी खांब उभारून येत्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकवलाच जाईल असा निर्धार पक्का करून आज गुरुवारी सकाळी सकाळीच हायमास्ट खांब उभारून घेतला. यावेळी शेकडो देशाभिमानी उपस्थित होते. ‘भारत माता की जय’चा नारा देत दाजी साळकर यांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या शंभर फूटी हायमास्ट राष्ट्रध्वजाचे वास्कोतील नागरिकांनी मोठ्या जल्लोषाने स्वागत केले.

संबंधित बातम्या