अखेर ज्येष्ठ महिलेच्या समस्येची घेतली दखल

dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

ठाणे - सत्तरी येथील ७० वर्षीय ज्येष्ठ महिला अन्नपुर्णा परवार यांना गेल्या सात महिन्यांपासून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत, अशी बातमी दै. ‘गोमन्तक’ने २८ एप्रिलच्या अंकात प्रसिध्द केली होती. त्या वृत्ताची समाज कल्याण खात्याने दखल घेतली आहे,

वाळपई

ठाणे - सत्तरी येथील ७० वर्षीय ज्येष्ठ महिला अन्नपुर्णा परवार यांना गेल्या सात महिन्यांपासून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत, अशी बातमी दै. ‘गोमन्तक’ने २८ एप्रिलच्या अंकात प्रसिध्द केली होती. त्या वृत्ताची समाज कल्याण खात्याने दखल घेतली असून त्या महिलेच्या योजना मंजूर झालेला नोंदणी क्रमांक, बँक खातेदार क्रमांक याविषयी सविस्तर माहिती घेतली आहे, अशी माहिती ठाणेचे पंच नीलेश परवार यांनी दिली आहे. अन्नपुर्णा परवार या आपल्या घरी एकट्याच रहात असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य याआधी केलेले आहे. यापुढेही मदतीचा हात दिला जाणार आहे, असे नीलेश परवार म्हणाले.

संबंधित बातम्या