नदी परिवहन खात्यात होणार आर्थिक तपासणी, अधिकारीही धास्‍तावले

विलास ओहाळ
मंगळवार, 10 मार्च 2020

पणजी: नदी परिवहन खात्यातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पुन्हा तपासणीसाठी आलेल्या तपशीलासह आर्थिक व्यवहार तपासणी (डिटेल ऑडिट) समितीने लेखा विभागाकडे (अकाऊंट डिपार्टमेंट) मागील पाच वर्षांचा संपूर्ण आर्थिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल सादर करण्यासाठी काही तासांची मुदतही दिली असून, तो अहवाल आल्यानंतर राज्याच्या अर्थखात्याकडे जमा झालेल्या रकमेचा ताळेबंद ही समिती लावणार आहे.

आर्थिक गैरव्यवहाराशी आवश्‍यक असणारी काही महत्त्वाची कागदपत्रे या समितीच्या हाती लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समितीने सकाळी काही कागदपत्रे ताब्यात घेतली आणि लेखा विभागातील अधिकाऱ्यांना मागील पाच वर्षांचा आर्थिक व्यवहाराची सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. मागील वर्षी २०१९ मध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या अहवालात एखादा मुद्दा नजरेआड झाला, तरीही तो या तपासणीत पुढे येण्याची दाट शक्यता आहे.

डिटेल ऑडिट पुन्हा तपासणी करणार आहे, म्हटल्यानंतर बंदर कप्तान विभाग आणि लेखा विभागातील जे घोटाळ्याशी संबंधित आहेत, ती मंडळी चांगलीच धास्तावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काहीजणांनी आपले संबंध वापरून मंत्र्यांपर्यंत जाण्याची तयारी सुरू केली आहे.

संबंधित बातम्या