गोमंतकीय खात नसलेल्या मासळीची निर्यात !

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

सन २०१६-१७ मध्ये तयार केलेल्या मत्स्यपालनांच्या ‘निलक्रांती एकात्मिक विकास आणि व्यवस्थापन' या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत सरकारने राज्यात टाळेबंदीच्या काळात फिरून मासळी विक्रीस प्रारंभ केला आहे

पणजी, विक्रीस फिरून परवानगी मिळाल्यानंतर राज्यात दुचाकींवरून मासे विक्री करणारे दिसू लागले आहेत. मालीम जेटीवर बोटीतून येणाऱ्या मासळीपैकी २० ते ३० टक्के मासळी जी गोमंतकीय खातात. इतर जातीची मासळी आम्हाला परराज्यात निर्यात करावी लागत असल्याची माहिती मांडवी फिशरमन मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी ‘गोमन्तक'ला दिली. सन २०१६-१७ मध्ये तयार केलेल्या मत्स्यपालनांच्या ‘निलक्रांती एकात्मिक विकास आणि व्यवस्थापन' या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत सरकारने राज्यात टाळेबंदीच्या काळात फिरून मासळी विक्रीस प्रारंभ केला आहे. त्यासाठी वरील योजनेंतर्गत दिलेल्या वाहनांचा वापर मासळी विक्रीसाठी केला जात आहे. परंतु राज्यात मासेमारीला सुरूवात झाली आणि बाजारात मासळी आलीतरी एवढी महाग मासळी कशी, असा सवाल सामान्य जनेतेतून विचारला जात आहे. याविषयी हर्षद धोंड यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की मासेमारीसाठी गेलेल्या बोटीवर एकाच प्रकारची मासळी येत नाही. एखाद्या बोटीत गोव्यातील लोक जी मासळी खातात, त्याचे प्रमाण साधारण ३० ते ४० टक्के असते. उर्वरित ६० ते ७० टक्के मासळी ही दुसऱ्या जातीची असल्याने ते गोवेकर खात नाहीत. त्यामुळे ती मासळी परराज्यात पाठवावी लागते. मागणी वाढली आणि आवक कमी झाली की मासळीचे दर वाढतात. गेली दोन दिवस खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी फिरू लागल्या आहेत, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत मासळीचे दर उतरतील. गोव्यातील लोक काही मोजक्याच जातीची मासळी खातात. बोटीतून येणाऱ्या मासळीत बुगडी, खापी, खारेबांगडे, लालबी अशी मासळीही जी गोमंतकीय खात नाहीत, ती येते आणि त्या मासळीचे प्रमाणे अधिक असल्याने तिची केरळमध्ये निर्यात करावी लागते. केरळमध्ये मासळीला मोठी मागणी असल्याने तेथील व्यापारी ही मासळी घेऊन जातात, असेही धोंड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या