मासळी मार्केट रविवारपासून सुरू

dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे बंद असलेले मासळी मार्केट रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे. मासळी मार्केटमधील दोन्ही बाजूच्या दोन लाईन सुरू करण्यात येतील. त्यात फक्त ५० विक्रेत्यांना बसविण्यात येणार आहे. दरम्यान, आज सायंकाळी महापौर, आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांनी पाहणी केली.

पणजी

टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे बंद असलेले मासळी मार्केट रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे. मासळी मार्केटमधील दोन्ही बाजूच्या दोन लाईन सुरू करण्यात येतील. त्यात फक्त ५० विक्रेत्यांना बसविण्यात येणार आहे. दरम्यान, आज सायंकाळी महापौर, आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांनी पाहणी केली.
मासळी मार्केट सुरू करावी, अशी मागणी विक्रेत्यांची होत होती. दारावर विक्रीस येणाऱ्या मासळीचे दर न परवडणारे असल्याने लोकांचा सध्या शाकाहारावर अधिक भर आहे. ज्यांच्याकडे सुकी मासळी होती, तीही आता संपत आली आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मासळी मिळत असल्याने लोकांनाही खरेदी करण्यास वाव असतो. टाळेबंदीतील झालेल्या नियमांच्या शिथिलतेमुळे मासळी मार्केट खुले करण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती, त्यांनी त्यास परवानगी दिल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
मासळी मार्केटमध्ये विक्रेत्यांमध्ये शिस्त राहण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असून सुरक्षीत अंतर आणि मास्कची सक्ती हे नियम नागरिकांना पाळावे लागणार आहेत. सध्या महापालिकेचे मार्केट बंद असल्याने भाजीपाला विक्रेत्यांसाठी महापालिकेने ऑयनॉक्सच्या मागील रस्त्यावर दुकाने थाटण्यासाठी सोय केली आहे. नागरिकांना विक्रेत्यांसमोर उभे राहण्यासाठी आखणी केली असली तरी त्याचे पालन कोणीही करताना दिसत नाही. बाजारात सहजरित्या फेरफटका मारतात, तसा प्रकार सध्या येथे पहायला मिळत आहे. आता मासळी मार्केट खुले केल्यानंतर तेथे कशाप्रकारे शिस्त राखली जातेय, ते पहावे लागणार आहे.

मार्केट सुरू करण्याची मागणी
महापालिकेचे मार्केट येत्या ४ मे पासून सुरू करावे, अशी मागणी पणजी म्युन्सिपल मार्केट टेंट असोसिएशनने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मार्केटमधील दुकाने बंद असल्याने अनेकांची आर्थिक कोंडी झालेली आहे. त्याशिवाय अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे मासिक हप्त भरण्यासही पैसे नाहीत. मार्केट सुरू करण्यास जर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास मोठा व्यापाऱ्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. केंद्र सरकारने टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी येत्या ४ मे पासून मार्केट खुले करण्यास परवानगी द्यावी. तसेच सर्व नियमांनुसार आम्ही आमचे व्यवसाय सुरू करू, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर

संबंधित बातम्या