अखेर तिरंगा फडकावलाच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

मुरगाव:वास्को रेल्वे स्थानकासमोर तिरंगा फडकलाच
शेकडो राष्ट्रभिमानी नागरिकांची उपस्थिती मात्र, ‘त्या’ अज्ञात तक्रारदाराचा पत्ता नाही
अज्ञाताने केलेल्या दूरध्वनीचा आधार घेऊन वास्को रेल्वे स्थानकासमोर शंभर फूट उंच देशाचा तिरंगा फडकाविण्यास वास्को पोलिसांनी आडकाठी आणल्यानंतरही अखेर नगरसेवक दाजी साळकर यांनी भारतीय तिरंगा फडकावून आपले राष्ट्रप्रेम स्पष्ट केले.

देशातील अन्य रेल्वे स्थानकवर उंच तिरंगा फडकवण्याच्या पार्श्वभूमिवर वास्कोतही अशा प्रकारचा तिरंगा फडकावा यासाठी नगरसेवक दाजी साळकर यांनी पुढाकार घेऊन रेल्वेकडे पत्रव्यवहार केला.त्यांच्या विनंतीला मान देऊन रेल्वेने वास्कोत शंभर फूट हायमास्टवर तिरंगा फडकाविण्यास हिरवा कंदिल दाखविला.त्यानूसार जोशी चौकात हा हायमास्ट उभारण्याचे काम सुरू असताना वास्को पोलिसांनी ते बंद पाडले.कोणी अज्ञातांनी फोन करून तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले.तथापि, तो अज्ञात तक्रारदार कोण हे मात्र पोलिसांनी उघड केले नाही.
राष्ट्रीय झेंडा फडकाविण्यास एका निनावी व्यक्तीच्या तक्रारीवरून वास्को पोलिसांनी आडकाठी आणल्याचे वृत्त राष्ट्रभिमानी नागरिकांना रुचले नाही.अनेकांनी पोलिस स्थानकावर धाव घेऊन तिरंगा फडकाविण्यास आडकाठी आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.हे प्रकरण अंगलट येईल या भीतीने अखेर पोलिसांनी तिरंगा फडकाविण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या शंभर फूटी हायमास्ट खांब उभारण्यास परवानगी दिली.
पोलिसांच्या परवानगीनंतर गेल्या आठवड्यात शंभरफूटी हायमास्ट जोशी चौकात उभारण्यात आला.या हायमास्टवर भला मोठा भारतीय तिरंगाही फडकाविण्यात आला आहे.तिरंगा फडकाविण्यापूर्वी नगरसेवक दाजी साळकर यांनी तिरंग्याची विधीवत पूजा केली.त्यानंतरच शंभर फूट उंच राष्ट्रीय तिरंगा हायमास्टवर फडकाविण्यात आला.यावेळी शेकडो राष्ट्रभिमानी नागरिक उपस्थित होते. ‘भारत माता की जय, वंदे मातरम’च्या घोषणा यावेळी नागरिकांनी दिली.

मतदार यादीतून गाळलेल्या नावांची यादी प्रदर्शित

संबंधित बातम्या