मुंबई सिटीचा बंगळूरवर महत्त्वपूर्ण विजय  

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

मुंबई:इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी मुंबई सिटी एफसीने गतविजेत्या बंगळूर एफसीवर २-० असा महत्त्वपूर्ण विजय प्राप्त केला.

मुंबई:इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी मुंबई सिटी एफसीने गतविजेत्या बंगळूर एफसीवर २-० असा महत्त्वपूर्ण विजय प्राप्त केला.
या निकालामुळे गुणतक्त्यात आघाडी घेण्याच्या बंगळूरच्या आशांना धक्का बसला. १३ सामन्यांत त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला. सहा विजय आणि चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे २२ गुण आणि दुसरे स्थान कायम राहिले. एफसी गोवा १२ सामन्यांतून २४ गुणांसह आघाडीवर आहे. तिसऱ्या स्थानावरील एटीके संघाचे १२ सामन्यांतून २१, तर चौथ्या स्थानावरील ओडिशा एफसीचे १३ सामन्यांतून २१ गुण आहेत. मुंबई सिटीने १३ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून चार बरोबरी आणि चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १९ गुण झाले. त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले.
गतविजेत्यांना धक्का देताना मुंबई सिटीने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल केला. मोदू सुगू याने १३व्या मिनिटास आघाडीचा गोल केल्यानंतर अमिन चेर्मिटी याने ५५व्या मिनिटास संघाची आधाडी वाढविली.

 

 

 

 

 

 

हल्याळ येथे राज्यस्तरीय सबज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक

संबंधित बातम्या