विदेशी काजुमुळे दरावर परिणाम : प्रकाश वेळीप 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

सासष्टीः गोव्यातील चांगल्या प्रतीचा काजू खरेदी करण्यास परवडत नसल्यामुळे स्वस्तात मिळणाऱ्या विदेशी काजू खरेदीवर भर देण्यात येत आहे. भारतात प्रक्रिया केलेला काजू किती प्रमाणात आयात होतो, याची माहिती उपलब्ध नसल्यामुळे सरकारने काजूचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात होणाऱ्या काजूसाठी धोरण आखणे आवश्यक आहे, अशी मागणी गोवा कृषी विपणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केली. बोविपणन मंडळ काजूचे दर निश्चित करीत नसून बाजारातील अर्थकारणावरून हा दर निश्चित होतो, असेही त्यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत श्री. वेळीप बोलत होते.

गोमंतकीय काजूला असलेली दर्जात्मक चव विश्वात अन्य कुठेही मिळत नसून गोव्यात मोठ्या प्रमाणात काजूची लागवड करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना काजू उत्पन्नाला चांगला दर मिळावा, यासाठी गोवा सरकार हमी दर देत आहे. काजूचे दर शंभर रूपयाहून कमी असल्यास सरकार शेतकऱ्यांना दरातील फरक देत आहे. परंतु, गोव्यातील दर्जात्मक काजू खरेदी करण्यास परवडत नसल्यामुळे बाहेरुन स्वस्तात मिळणारा काजू खरेदी करण्यात येत आहे. फ्री मार्केट असल्यामुळे विदेशी काजू भारतात पोहचत असून याचा थेट फटका गोमंतकीय काजूला बसत आहे, असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

काजू प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना गोमंतकीय काजू करण्यास परवडत नसल्यामुळे विदेशी आयात होणाऱ्या स्वस्त काजू खरेदी करण्यास कारखानदार पसंत करीत आहेत. कारखानदाराला काजू खरेदी करण्यास परवडत नसल्यामुळे अनेक काजू प्रक्रिया कारखान्याला टाळे लागलेले आहे. प्रक्रिया केलेला विदेशी काजू किती प्रमाणात दाखल होतो याची कुठलीही माहिती उपलब्ध नसून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने धोरण आखणे महत्वाचे आहे, असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले. काजूचा दर कृषी विपणन मंडळाद्वारे निश्चित करण्यात येत असल्याचा काहींचा समज आहे. परंतु, हे दर बाजार अर्थव्यवस्थेवरुन ठरविले जाते, असेही त्यांनी सांगितले.

बदनामी केल्यास मोर्चा काढणार
गोव्यात काजूचे दर आदर्श कृषी संस्था ठरवित नसून काजूचे दर घरसत चालण्यामागे कोण जबाबदार आहे, हे कुणाला ठाऊक असल्यास त्यांनी चौकशी करावी. आदर्श कृषी संस्था शेतकऱ्यांच्या कृषी मालास चांगला दर देणारी संस्था असून या संस्थेशी जोडलेले सर्व शेतकरी एकत्र असल्यामुळे कुणीही शेतकऱ्यांची फसवणूक करू शकत नाही. आदर्श कृषी संस्थेची बदनामी करण्यासाठी आरोप करीत राहिल्यास बदनामी करणाऱ्यांच्या घरावर मोर्चा नेण्यात येणार, असा इशारा आदर्श कृषी संस्थेच्या सभासदांनी केला.
 
संबंधित बातम्या