विदेशी जहाजांवर ३१ मार्चपर्यंत बंदी, मुरगाव पोर्ट ट्रस्टचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजीः जगभरात झालेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे मुरगाव बंदरात विदेशातून येणाऱ्या प्रवासी जहाजांवर ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही जहाजे नांगरण्यासाठी बंदरात स्वतंत्र धक्का असूनही हा निर्णय घेण्यात आला आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्टने तसा निर्णय घेऊन संबंधितांना कळवले आहे.

युरोप व आखाती देशातून प्रवासी जहाजे आशिया खंडात येत असतात. ती जहाजे एका मुक्कामासाठी मुरगाव बंदरात येतात. या जहाजावर प्रामुख्याने श्रीमंत पर्यटकांचा भरणा असतो. त्यामुळे अशा जहाजातील प्रवाशांपासून पर्यटन व्यवसायातील मोठी उलाढाल होते. ते प्रवासी केवळ खरेदी करतात ते राहण्यासाठी परत जहाजावर जात असतात. आता ती जहाजे येणे बंद झाल्याने त्या पर्यटकांना गोवा दर्शन करण्याची सेवा पुरवठादारांचा व्यवसाय बुडणार आहे.

कोरोनाच्या प्रसाराला जागतिक आरोग्य संघटनेने जवळजवळ महामारी असे आज संबोधले आहे. एक लाख दहा हजारांवरील संशयित रुग्ण जगभरात सापडले आहेत. तीन हजार १०० जणांचा मृत्यू या रोगाच्या प्रादुर्भावाने आजवर झाला आहे. चीनमध्ये ८० हजार ८५९ रुग्ण सापडले त्यापैकी ३ हजार ११९ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत ९ हजार १७२ रुग्ण सापडले त्यापैकी ४६३ जणांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरीयात ७८२ पैकी ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये ७ हजार १६१ पैकी २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये १ हजार २०४ पैकी २८ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सात १ हजार १२६ पैकी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जर्मनी, जपान आणि अमेरीकेत आदींसह १०५ देशांत या कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण सापडले आहेत. यामुळे विदेशी प्रवासी जहाजे मुरगाव बंदरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 
संबंधित बातम्या