गोव्यातील ऑनलाईन बुद्धिबळात परदेशींनाही रुची

Dainik Gomantak
सोमवार, 13 एप्रिल 2020

लॉकडाऊन कालावधीत क्वीन्स चेस क्लबने तिसरी स्पर्धा घेतली. कोरोना विषाणूमुळे घरात बंदिस्त असलेल्या बुद्धिबळपटूंना सक्रिय करण्यासाठी क्वीन्स चेस क्लबने राबविलेला उपक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला आहे

पणजी :

कोरोना विषाणू महामारीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत ताळगाव येथील क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबने घेतलेल्या ऑनलाऊन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत परदेशी खेळाडूंनीही भाग घेतला, त्याच संयुक्त अरब अमिरातीतील आठ, तर सिंगापूरमधील एका बुद्धिबळपटूचा समावेश होता.
लॉकडाऊन कालावधीत क्वीन्स चेस क्लबने तिसरी स्पर्धा घेतली. कोरोना विषाणूमुळे घरात बंदिस्त असलेल्या बुद्धिबळपटूंना सक्रिय करण्यासाठी क्वीन्स चेस क्लबने राबविलेला उपक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. या स्पर्धेद्वारे मिळणारे आर्थिक उत्पन्न आयोजकांनी मुख्यमंत्री कोव्हिड-१९ मदत निधीस दान करण्याचे ठरविले आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी. आर. व्यंकटराम राजा यांनीही क्वीन्स चेस क्लबच्या कौतुकास्पद उपक्रमाची दखल घेतली असून सलग तीन ऑनलाईन ब्लिट्झ स्पर्धा घेतल्याबद्दल शाबासकी दिली आहे. तशा आशयाचा दूरध्वनी संदेश त्यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांच्यामार्फत पाठविला आहे, असे क्लबच्या अध्यक्ष डॉ. रूपा बेलुरकर यांनी सांगितले.
क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबच्या तिसऱ्या ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तमिळनाडूच्या दिनेश राजन याने विजेतेपद मिळविले. गोमंतकीय खेळाडूंत फिडे मास्टर नीतिश बेलुरकर व वूमन कँडिडेट मास्टर गुंजल चोपडेकर यांनी लक्षवेधी कामगिरी बजावली. नीतिशला आठवा, तर गुंजलला ११वा क्रमांक मिळाला. 

संबंधित बातम्या