गोळावळीतील कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून मदत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पर्ये: गोळावळीतील पट्टेरी वाघाकडून गाय मारलेल्या कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून मदत करण्यात आली आहे. आज वनखात्याचे अधिकारी कुलदीप शर्मा यांच्या हस्ते 15 हजार  मदत निधीचा धनादेश विठो पावणे कुटुंबाला देण्यात आला. यावेळी सत्तरी उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, वाळपई चे मामलेदार अनिल राणे , डिचोलीचे पोलीस उपाधिक्षक गावडे ,वाळपई चे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर, सामाजिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वाळपई चे भाग शिक्षण अधिकारी बर्वे, नागरी पुरवठा कार्यालयाचे निरीक्षक वनखात्याचे अधिकारी सत्तरी धनगर समाजाचे अध्यक्ष बी. डी. मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्ये: गोळावळीतील पट्टेरी वाघाकडून गाय मारलेल्या कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून मदत करण्यात आली आहे. आज वनखात्याचे अधिकारी कुलदीप शर्मा यांच्या हस्ते 15 हजार  मदत निधीचा धनादेश विठो पावणे कुटुंबाला देण्यात आला. यावेळी सत्तरी उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, वाळपई चे मामलेदार अनिल राणे , डिचोलीचे पोलीस उपाधिक्षक गावडे ,वाळपई चे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर, सामाजिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वाळपई चे भाग शिक्षण अधिकारी बर्वे, नागरी पुरवठा कार्यालयाचे निरीक्षक वनखात्याचे अधिकारी सत्तरी धनगर समाजाचे अध्यक्ष बी. डी. मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नागरी पुरवठा कडून दोन्ही कुटुंबांना मिळून सुमारे 35 किलो तांदूळ रेशन कोटा देण्यात आला आहे. 
पोलिसांची राहणार सुरक्षा
दरम्यान या तिन्ही कुटुंबाचे पुरुष लोक अटकेत असल्याने त्यांच्या रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याला अनुसरुन  वळपईतील पोलीस रात्रीच्यावेळी येथे तैनात करण्यात आले आहे. रात्री आठ ते सकाळी आठ अशी त्यांची नियुक्ती असेल.त्याच बरोबर गेल्या आठवड्यापासून येथील विद्यार्थी शाळेत गेले नव्हते, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.उद्यापासून त्यांना त्यांच्या वस्तीपासून रिवे - गोळावळी बसपर्यंत सोडण्याची सोय पोलीस करणार आहे.तसेच दूध पोहोचवण्याची पद्धत मदत करण्याची सवय करण्यात येणार आहे. 
अटकेतील सुटेपर्यंत मदत द्यावी 
धनगर समाजाचे अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी सांगितले कि सरकारच्या आजच्या या पावलामुळे आम्ही सरकारचे आभार व्यक्त करतो. सत्तरीतील समाज बांधव ,गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते, वर्तमानपत्रे, ठाणे -डोंगुर्ली पंचायत इत्यादींनी या आमच्या कुटुंबाच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवून सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो.तसेच त्यांनी मागणी केली कि संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेल्या व्यक्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ही मदत देत राहावे.

दुसऱ्या कुटुंबाला मदत नाही
दरम्यान येथील म्हैस मारलेल्या दुसऱ्या कुटुंबाला आज मुख्यमंत्री निधीतून मदत मिळू शकले नाही. यासंबंधी विचारले असता त्या कुटुंबाने नुकसान भरपाई अर्ज केल्याने त्यांना मदत देऊ शकलो नाही असे सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी अर्ज केल्यावर मदत दिली जाईल. यासंबंधी सत्तरी धनगर समाजाचे अध्यक्ष मोठे यांनी अर्ज करणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या