स्थानिकांची पदपुलाची मागणी पूर्णत्‍वास

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

आमदार दयानंद सोपटे : पालये वांगडवाडा येथे पदपुलाच्या बांधकामाची पायाभरणी

पदपुलाच्या बांधकामाची पायाभरणी करताना सरपंच उदय गवंडी. बाजूला आमदार दयानंद सोपटे, उपसरपंच तारिका तारी, उर्मिला तिळवे, सागर तिळवे, मधू परब, प्रशांत नाईक

तेरेखोल : सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पालये वांगडवाडा येथे १४ लाख रुपये खर्चून पदपुलाच्या बांधकामाची पायाभरणी मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी केले. अनेक वर्षांची स्थानिक ग्रामस्थांची पदपुलाच्या बांधकामाची मागणी पूर्ण झाली असून मांद्रे मतदारसंघात १० कोटी ५० लाखांच्या विकास कामांच्या निविदा मागवण्यात आल्याची आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी दिली.

यावेळी सरपंच उदय गवंडी, उपसरपंच तारिका तारी, पंच प्रशांत नाईक, उर्मिला तिळवे, सागर तिळवे, पंच व मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब, माजी पंच प्रशांत पालयेकर, सत्यवान परब व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी सरपंच उदय गवंडी व अन्य पंच सदस्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पदपुलाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली.

याप्रसंगी आमदार सोपटे म्हणाले की, मांद्रे मतदारसंघात अपूर्णावस्‍थेत असलेल्या अनेक विकासकामांना चालना मिळत असल्याचे मांद्रे पंचायत क्षेत्रातील सरपंच, पंच व ग्रामस्थ सांगत असल्याने आहेत. त्‍यामुळे आपण समाधानी आहे.पालये पंचायत क्षेत्रातील विकास कामांसाठी ३ कोटी ७५ लाखांची निविदा काढण्यात आली आहे.मांद्रे मतदारसंघात हरमल, पार्से पंचायत क्षेत्रांत अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक विकासकामे स्थानिक पंचायतींचे सरपंच, पंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने होत आहेत.

मंत्री फिलिप नेरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांच्या सहकार्यामुळे संबंधित खात्यांतर्गतची कामे आपण पूर्णत्वास नेऊ शकलो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही आभार मानतो.
सरपंच उदय गवंडी यांनी अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास आल्याने समाधान व्यक्त करून आमदारांचे बऱ्यापैकी सहकार्य मिळत आहे.मांद्रे मतदारसंघातील पालये पंचायत क्षेत्रात अधिक विकास कामे मार्गी लागली आहेत.

उपसरपंच तारिका तारी म्हणाल्या की, आमदारांकडून ज्या गतीने विकास कामांना चालना मिळत आहे ती गती मांद्रे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची चाहूल आहे.त्यांच्या प्रयत्नांना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

पंच प्रशांत नाईक यांनी आतापर्यंत अनेक विकासकामे आपल्या प्रभागात मागणीनुसार पूर्णत्वास नेण्यात आली आहेत, असे सांगितले

संबंधित बातम्या