गोव्‍यात चार कोरोनाग्रस्‍त रूग्‍ण झाले बरे.

Dainik Gomantak
शनिवार, 11 एप्रिल 2020

गोव्‍यात असणार्‍या कोरोनाग्रस्‍त रूग्‍णांपैकी चार रूग्‍णांची कोरोना चाचणी निगेटिव्‍ह आली आहे. राज्‍यात आता दोन कोरोनाग्रस्‍त रूग्‍ण असून हे रूग्‍ण लवकर बरे होणार असल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी हि आनंदाची बातमी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून दिली.

पणजी,
गोव्‍यात असणार्‍या कोरोनाग्रस्‍त रूग्‍णांपैकी चार रूग्‍णांची कोरोना चाचणी निगेटिव्‍ह आली आहे. राज्‍यात आता दोन कोरोनाग्रस्‍त रूग्‍ण असून हे रूग्‍णही लवकर बरे होणार असल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी हि आनंदाची बातमी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून दिली. या ट्‍विटमध्‍ये त्‍यांनी कोरोनाग्रस्‍तांवर मडगाव येथील इएसआय रूग्‍णालयात उपचार करणारे डॉ. एडवीन गोम्‍स आणि त्‍यांच्‍या इतर सहकार्‍यांचेही अभिनंदन केले आहे. 
आरोग्‍य खात्‍यातील माहितीदारांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या नियमावलीनुसार या चारही व्यक्तींच्या गेल्या ४८ तासात केल्या गेलेल्या दोन्ही कोरोना पडताळणी चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे हे रुग्ण आता कोरोनाग्रस्त नसल्‍याचे म्‍हणजेच त्‍यांच्‍या शरीरावर कोरोना विषाणूचा प्रभाव नसल्‍याचे सिध्‍द होते.  
नियमानुसार आणखी १४ दिवस विलगीकृत ठेवण्यात येणार आहे. हे विलगीकरण इतर कोरोनाग्रस्त रूग्णांपासून वेगळ्या कक्षात असणार आहे.

राज्‍यातील आणखी चार कोरोनाग्रस्‍त बरे झाले असून त्‍यांच्‍यावर अत्‍यंत कष्‍टाने उपचार करणार्‍या डॉक्‍टरांच्‍या टीमचे अभिनंदन मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. गोवा आता कोरोगाविषाणूमुक्‍तीच्‍या वाटेवर असल्‍याचेही मुख्‍यमंत्र्‍यांनी लिहले आहे. 

संबंधित बातम्या