चार लाख मास्‍क उपलब्‍ध : आरोग्‍यमंत्री

Dainik Gomantak
बुधवार, 15 एप्रिल 2020

राज्यात मास्क वापरणे सक्तीचे केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

पणजी,

राज्यातील लोकांना वापरण्यासाठी ३ ते ४ लाख मास्क बचत गटाच्या महिलांकडून तयार केले आहेत. ते लवकरच लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. हे मास्क १७ रुपयांपेक्षा कमी किमतीत लोकांना उपलब्ध करून दिले जातील, असे आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजित राणे यांनी सांगितले. तसेच विमानतळे खुली केल्‍यावर राज्यात येणाऱ्या व्यक्तीकडे ‘कोरोना निगेटिव्ह’ प्रमाणपत्र असेल, तरच प्रवेश दिला जाईल, असेही आरोग्‍यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात मास्क वापरणे सक्तीचे केले जाणार असल्याचे ते म्हणाले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यात ठिकठिकाणी कोरोनाबाबत काम करण्याऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी प्रेरणादायी व्याख्यान घेतल्याची माहिती मंत्री राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली.

संबंधित बातम्या