सॅमी तावारीस, दत्ताराम राऊत, जॉन आगीयार यांना राष्ट्रपतीपदक

Four Officers got Presidential Medal
Four Officers got Presidential Medal

पणजीः पोलिस उपअधीक्षक सॅमी तावारिस व पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम विश्वास राऊत यांना उत्कृष्ट सेवेसाठी प्रतिष्ठेचे राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. तसेच पणजी होम गार्ड विभागाचे मानद कंपनी कमांडर जॉन आगीयार यांनाही ‘राष्ट्रपती गृहरक्षक आणि नागरी संरक्षण प्रतिष्ठीत सेवा पदक’ प्राप्त झाले आहे. नवी दिल्लीतून भारत सरकारच्या गृह व्यवहार मंत्रालयाकडून राष्ट्रपती प्रतिष्ठीत सेवा पदकाचा पुरस्कार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी इतर पुरस्कािरांचीही घोषणा करण्याकत आली. नवी दिल्लीतून भारत सरकारच्या गृह व्यवहार मंत्रालयाकडून राष्ट्रपती प्रतिष्ठीत सेवा पदकाचा पुरस्कार प्रउत्कृष्ट सेवेसाठी रवळू दत्ताराम गावस (विभाग प्रमुख गृहरक्षक) आणि सांतान फ्रान्सिस डायस (गृहरक्षक स्वयंसेवक) यांना प्राप्त झाला आहे. अग्निशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे.

“राष्ट्रपती गृहरक्षक आणि नागरी संरक्षण प्रतिष्ठीत सेवा पदक ” मिळविणारे जॉन आगीयार हे गोव्यातील पहिले होमगार्ड मानकरी आहेत. फोंडा येथील सेंट मेरी हायस्कूल आणि मडगाव येथील श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाचे ते विद्यार्थी असून महाविद्यालयीन शिक्षण काळात ते अष्टपैलू विद्यार्थी ठरले होते. पुण्यातील टिळक विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची मास्टर पदवी प्राप्त केली आहे.

गोवा राज्यातील माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे माहिती अधिकारी जॉन आगीयार हे “राष्ट्रपती होमगार्ड आणि नागरी संरक्षण गुणवंत सेवा पदकाचे” मानकरी आहेत. होमगार्डमध्ये प्रशंसनिक सेवा बजाविल्याबद्दल त्यांना माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते २०१२ मध्ये हे पदक प्रदान करण्यात आले होते. १९ डिसेंबर २००७ साली गोवा मुक्तीदिनी त्यांना मुख्यमंत्री सुवर्णपदक माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते देण्यात आले. चेन्नई येथे २००३ मध्ये झालेल्या मावळणकर राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com