‘आप’च्या उमेदवारास सार्दिनकडून धमकी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

मडगाव: आम आदमी पार्टीच्या (आप) गिरदोली मतदारसंघाच्या उमेदवार रुदोल्फिना वाझ यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फ्रान्सिस सार्दिन यांनी धमकी दिल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. आपला भाजपचा ‘ब’ संघ अशी संभावना करणाऱ्या सार्दिन यांनी राजकारणातून निवृत्त होऊन आराम करावा असा सल्लाही दिला आहे.

सार्दिन यांनी मोबाईलवरून संपर्क साधून आपल्यास उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली, असा आरोप वाझ यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी आपचे राज्य निमंत्रक एल्वीस गोम्स, आपच्या कोलवाच्या उमेदवार ऐश्वर्या फर्नांडिस व बाणावलीचे उमेदवार हेन्झल फर्नांडिस उपस्थित होते.

काँग्रेसचे कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनी पक्षांतर केले, तेव्हा सार्दिन गप्प राहिले. आता मी निवडणुकीस उभे राहात असताना त्यांना यात खोडा टाकावासा का वाटतो, असा आरोप वाझ यांनी केला. म्हादई, कोळसा प्रदूषण, सीझेडएमपी, नदी राष्ट्रीयीकरण आदी विषयांवर झालेल्या आंदोलनात सार्दिन यांचे कधी दर्शन घडले नाही. पण, आप निवडणूक रिंगणात उतरला तेव्हा ते झोपेतून जागे झाले, असे गोम्स यांनी सांगितले. यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपला सरकार स्थापन करण्यास का दिले होते, याचे सार्दिन यांनी जनतेस स्पष्टीकरण द्यावे अशी मगणी गोम्स यांनी केली.

संबंधित बातम्या