मुलींच्‍या स्‍वसंरक्षणार्थ बॉक्‍सिंगचे मोफत धडे, दिग्‍विजीत चव्‍हाण यांचा आदर्शवत उपक्रम

Dainik Gomantak
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

तेजश्री कुंभार
पणजी: मुलींनी आता सबल झाले पाहिजे, समाज नैतिक होत नाही म्‍हणून काय झाले. आता प्रत्‍येकीने आपल्‍यावर येणाऱ्या संकटासोबत स्‍वत: दोन हात करायला सक्षम बनले पाहिजे, अशा प्रकारचे अनेक फुकटचे सल्‍ले बलात्‍कारासारख्‍या घटना घडल्‍यावर समाजातून ऐकायला मिळतात. मात्र, केवळ सल्‍ले देण्‍यापेक्षा प्रत्‍यक्ष कृतीवर विश्‍‍वास ठेवणाऱ्या दिग्‍विजीत चव्‍हाण यांनी मुलींना मोफत स्‍वरक्षणाचे धडे म्‍हणजेच बॉक्सिंगचे मोफत प्रशिक्षण देण्‍यात सुरवात करून आदर्शवत पायंडा घातला आहे.

दिग्‍विजीत हे मडगावचे रहिवासी असून मुलींनी संभाव्‍य संकटांचा सामना स्‍वत: करीत सक्षम व निर्भिड होण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांचे मत आहे. याशिवाय रात्री प्रवास करणाऱ्या मुलींना घरी सुरक्षित पोहोचविण्‍याचे जबाबदारीचे कामही ते करतात. आपल्‍या देशात आसिफा, हैदराबाद बलात्‍कार प्रकरणासारखे अनेक प्रकार घडत असतात. गोव्‍यात सुदैवाने अशा प्रकारांचे प्रमाण नगण्‍य असले, तरी परराज्‍यातून कामानिमित्त स्‍थलांतरित होणाऱ्या काही लोकांमुळे अनेक समस्‍या निर्माण होतात. मुलींची छेडछाड होते तसेच हल्‍ली डिजिटल माध्‍यमातून त्‍यांना त्रास देण्‍याचे प्रमाण वाढले आहे. त्‍यामुळे मुलींनी बॉक्‍सिंगसारखे प्रशिक्षण घेत आपल्‍यासमोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्‍याचे धाडस दाखवायला हवे. सुदैवाने त्‍यांच्‍यावर असे कोणतेच संकट आलेच नाही, तरी त्‍यांच्‍यात या प्रशिक्षणामुळे दांडगा आत्‍मविश्‍‍वास येतो. दुर्दैवाने संकट आलेच तर त्‍या त्‍याचा मुकाबला करू शकत असल्‍याने मी हा उपक्रम सुरू केल्‍याचे दिग्‍विजीत यांनी सांगितले.

‘कॉल’ करा, त्‍वरित मदतीला येईन...
मुलींना सुरक्षेच्‍या बाबतीत कोणतेही संकट आले किंवा त्‍यांना कोणी त्रास देत असेल, रात्रीच्या वेळी घरी जाणे असुरक्षित वाटत असेल, तर त्‍यांनी ७७४५००४७७७ किंवा ८६६९७६७०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ज्‍यांना या कार्यात माझी मदत करण्‍याची इच्‍छा आहे त्‍यांनीही संपर्क साधावा. त्‍यांना त्‍यांच्‍या कामाचा योग्‍य मोबदला तर दिलाच जाईल. पण, समाजाची सेवा केल्‍यासाठी एक अनोखे समाधानही त्‍यांना मिळेल, असे दिग्‍विजीत यांनी नमूद केले. 

संबंधित बातम्या