फळ विक्रेत्यांच्या दुकानांना आग

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

कुठ्ठाळीत भाजी, फळ मार्केटचे

आगीत लाखो रुपयांचे नुकसान

कुठ्ठाळी : कुठ्ठाळी येथील मासळी बाजारात भाजी व फळ विक्रेत्यांच्या दुकानांना आज पहाटे सुमारे दोन वाजता आग लागली. त्या आगीत सुमारे १ लाख ४७ हजारांचे नुकसान झाले. राजेश कुमार प्रसाद (२० हजार नुकसान, भाजी विक्रेता), निरांजा हेरुर (२० हजार, भाजी विक्रेता), सीताबाई गाड (१५ हजार, भाजी विक्रेता), पळ विक्रेते रुपाली उदय शिरोडकर (२० हजार), पार्वती नार्वेकर (१२ हजार), मिलन हणखोणकर (१० हजार), प्लास्टीक विक्रेते - विजू हिरालाल (२० हजार), लक्ष्मी चंद्रशेखर (३० हजार) यांना अशा प्रकारे आर्थिक फटका बसला.

वेर्णा पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरिक्षक रियंका नाईक यांनी कुठ्ठाळी पोलिस चौकीचे पोलिस संतोष नाईक यांच्या साहाय्याने दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. यावेळी दाखल झालेल्या कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती साल्ढाणा यांनी घटनेची पाहणी करुन नुकसानग्रस्तांशी चर्चा केली. त्यानंतर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना केली.

 

मडगावात किंग ‘मोमो’ची राजवट सुरू

संबंधित बातम्या