बांबोळी मध्ये अनोख्या वस्तूंचे प्रदर्शन

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

फर्निचर फेअरमध्ये थायलंडची उत्पादने

बांबोळी : श्‍यामाप्रसाद स्टेडियममध्ये भरलेल्या फर्निचर फेअरमध्ये टर्की व थायलंडची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथे थायलंड आंतरराष्ट्रीय खरेदी महोत्सव आयोजित केला असून २ मार्चपर्यंत दिवसभर हे प्रदर्शन चालू राहील.

यामध्ये थायलंड फॅशन ज्वेलरी, स्पा प्रॉडक्ट्स, ॲक्सेसरीज, थायलंड होम डेकोरेशन, थायलंड हस्तकला वस्तू, अरोमा उत्पादने, आंब्याच्या लाकडावरील कलाकुसर , थायलंड हर्बल प्रॉडक्ट्स, टर्कीतील शोभिवंत दिवे तसेच कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत.

लिविंग रुम सेट्स, बेडरुम सेट्स, शिसवी फर्निचर, होम डेकॉर प्रॉडक्ट्स, कार्पेट्स व रग्ज, फर्निशिंग, डायनिंग सेट्स, आऊटडोअर फर्निचर, कोरीव लाकडी सोफा सेट्स, मसाज खुर्च्या, रिक्लायनर सोफा सेट्स, कारंजी, ग्‍लास पेंटिंग्‍ज व बरेच काही ग्राहकांना लुभावणार आहे. गोमतंकीय ग्राहकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

हे पाहा:  किनारी भागात बेकायदा बोटींग व्‍यवसाय

संबंधित बातम्या