पात्र राज्यांच्या हाती राष्ट्रीय स्पर्धेचे भवितव्य

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात नियोजित आहे.

पणजी,

 गोवा सरकारने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने पाठविलेल्या पत्रात वचनबद्धता प्रतिपादली आहे, त्याचवेळी पात्र संघांच्या सहभागाची खात्री करणे महत्त्वाचा मुद्दा राहील असेही नमूद केले आहे. यावरून स्पर्धेचे भवितव्य सहभागी राज्य-संघराज्यांच्या हाती असेल हे स्पष्ट आहे.

या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात नियोजित आहे. कोरोना विषाणू संसर्गाची देशव्यापी परिस्थिती अजून आटोक्यात आलेली नाही. परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल याबाबत स्पष्टता नाही. विशेषतः प्रमुख राज्यांतील कोविड-१९ महामारीची सद्यस्थिती पाहता, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील या राज्यांचा सहभाग सध्यातरी प्रश्नांकित आहे.  पाच वर्षांपूर्वी केरळमध्ये झालेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या राज्यांनी, तसेच सेनादलाने अधिकाधिक सुवर्णपदके जिंकली होती.

पणजी गोवा सरकारने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने पाठविलेल्या पत्रात वचनबद्धता प्रतिपादली आहे, त्याचवेळी पात्र संघांच्या सहभागाची खात्री करणे महत्त्वाचा मुद्दा राहील असेही नमूद केले आहे. यावरून स्पर्धेचे भवितव्य सहभागी राज्य-संघराज्यांच्या हाती असेल हे स्पष्ट आहे.

या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात नियोजित आहे. कोरोना विषाणू संसर्गाची देशव्यापी परिस्थिती अजून आटोक्यात आलेली नाही. परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल याबाबत स्पष्टता नाही. विशेषतः प्रमुख राज्यांतील कोविड-१९ महामारीची सद्यस्थिती पाहता, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील या राज्यांचा सहभाग सध्यातरी प्रश्नांकित आहे.  पाच वर्षांपूर्वी केरळमध्ये झालेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या राज्यांनी, तसेच सेनादलाने अधिकाधिक सुवर्णपदके जिंकली होती.

आयओएने यावर्षी १० फेब्रुवारीस गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पात्रता निकष परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार २०१९-२० वर्षात घेतलेल्या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेतील पहिले उत्कृष्ट ७ संघ-वैयक्तिक खेळाडू पात्र ठरतील. आठवी प्रवेशिका यजमान गोव्याची असेल. एथलेटिक्स, नेमबाजी आणि बॉक्सिंगमधील खेळाडूंची संख्या आयओए सचिवांच्या मान्यतेने असेल.

कोविड-१९ महामारीमुळे सध्या क्रीडापटू लॉकडाऊनमध्ये आहेत. ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे खेळाडू-प्रशिक्षक थोड्याफार प्रमाणात कार्यरत आहेत, पण प्रत्यक्ष मैदानापासून दूर असून ते पुन्हा कधी मैदानावर उतरतील याची स्पष्टता नाही. सध्या देशातील सर्व शिबिरे-स्पर्धा स्थगित आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांचे क्रीडापटू ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज होतील का याबाबत जाणकार साशंक आहेत. त्याचेच पडसाद गोव्याच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांनी आयओएचे सचिव राजीव मेहता यांना पाठविलेल्या पत्रात उमटले आहेत.

जे. अशोक कुमार यांनी पत्रात म्हटले आहे, की ‘‘परिस्थिती भीषण असूनही, मी आश्वस्त करू इच्छितो, की गोवा सरकार आणि आयोजन समिती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने वचनबद्धतेसाठी काम करत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली असून त्याअंतर्गत ३१-५-२०२० पर्यंत सर्व आवश्यक तयारीबाबत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कोविड-१९ परिस्थितीचे आकलन आणि आयओएशी सल्लामसलत करून स्पर्धेच्या आयोजनाविषयी योग्य निर्णय घेतला जाईल, यासाठी पात्र संघांच्या सहभागाची खात्री करणे महत्त्वाचा मुद्दा राहील.’’

२०१५मधील राष्ट्रीय स्पर्धेतील टॉपर्स संघ

संघ सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

सेनादल ९१ ३३ ३५ १५९

केरळ ५४ ४८ ६० १६२

हरियाना ४० ४० २७ १०७

महाराष्ट्र ३० ४३ ५० १२३

पंजाब २७ ३४ ३२ ९३

मध्य प्रदेश २३ २७ ४१ ९१

आठवी प्रवेशिका यजमान गोव्याची असेल. एथलेटिक्स, नेमबाजी आणि बॉक्सिंगमधील खेळाडूंची संख्या आयओए सचिवांच्या मान्यतेने असेल.

कोविड-१९ महामारीमुळे सध्या क्रीडापटू लॉकडाऊनमध्ये आहेत. ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे खेळाडू-प्रशिक्षक थोड्याफार प्रमाणात कार्यरत आहेत, पण प्रत्यक्ष मैदानापासून दूर असून ते पुन्हा कधी मैदानावर उतरतील याची स्पष्टता नाही. सध्या देशातील सर्व शिबिरे-स्पर्धा स्थगित आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांचे क्रीडापटू ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज होतील का याबाबत जाणकार साशंक आहेत. त्याचेच पडसाद गोव्याच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांनी आयओएचे सचिव राजीव मेहता यांना पाठविलेल्या पत्रात उमटले आहेत.

जे. अशोक कुमार यांनी पत्रात म्हटले आहे, की ‘‘परिस्थिती भीषण असूनही, मी आश्वस्त करू इच्छितो, की गोवा सरकार आणि आयोजन समिती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने वचनबद्धतेसाठी काम करत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली असून त्याअंतर्गत ३१-५-२०२० पर्यंत सर्व आवश्यक तयारीबाबत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कोविड-१९ परिस्थितीचे आकलन आणि आयओएशी सल्लामसलत करून स्पर्धेच्या आयोजनाविषयी योग्य निर्णय घेतला जाईल, यासाठी पात्र संघांच्या सहभागाची खात्री करणे महत्त्वाचा मुद्दा राहील.’’

२०१५ मधील राष्ट्रीय स्पर्धेतील टॉपर्स संघ

संघ सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

सेनादल ९१ ३३ ३५ १५९

केरळ ५४ ४८ ६० १६२

हरियाना ४० ४० २७ १०७

महाराष्ट्र ३० ४३ ५० १२३

पंजाब २७ ३४ ३२ ९३

मध्य प्रदेश २३ २७ ४१ ९१

संबंधित बातम्या