गांधीजींची सत्य,अहिंसा आजही जगाला तारक

शंभू भाऊ बांदेकर
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मोहनदास करमचंद गांधी हे अद्वितीय प्रकारचे व्यक्तिमत्त्‍व आहे.त्यांनी देश व देशवासियांच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्‍या स्वातंत्र्यानंतर सुराज्य होण्यासाठी जे अहर्निश प्रयत्न केले,ते इतिहास कधीही विसरु शकत नाही. म्हणजेच नेताजी आणि गांधीजींमध्ये वैचारिक मतभेद होते,हे खरे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते दोघे अहिंसा - हिंसा या मार्गाने कटिबद्ध होते.

विशेष लेख: नुकत्याच उद्‍भवलेल्या अमेरिका - इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात तिसरे महायुद्ध तर होणार नाही ना? या शंकेत जग चिंताक्रांत आहे. एका बाजूने जग आर्थिक मंदीच्या ज्वालेत होरपळत असताना दुसऱ्या बाजूने महायुद्धास प्रारंभ झाला, तर जगाची ‘न भूतो न भविष्यति’ हानी होणार यात शंका नाही. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अभूतपूर्व कार्यास व अद्वितीय व्यक्तिमत्त्‍वास त्रिवार अभिनंदन.

अशा पार्श्वभूमीवर जगाने महात्मा गांधीजींच्या सत्य व अहिंसा तत्त्‍वांचा विचार करून त्यापासून बोध घ्यावा व जगात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करावा, असे म्हणणारे जागतिक नेते मार्टिन ल्यूथट किंग, नेल्सन मंडेला, ओबामा बराक आदी मंडळी इतिहासजमा झाली आहेत. त्यामुळे जगात सशक्त क्रांतीविश्‍वात दुसरा पर्याय अस्तित्त्‍वात नाही, असे राजकीय मुत्‍सद्यांचे मत बनू लागले आहे. अशावेळी प्रकर्षाने आठवण होते ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. नेताजींचे ठाम मत होते की, गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणे कदाचित शक्य नाही. म्हणूनच या जहाल व क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानीने विदेशात जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली व सशस्त्र क्रांतीसाठी त्यांनी रणशिंग फुंकले. ‘तुम मुझे खून दो। मैं तुम्हे आजादी दूँगा।’ अशी घोषणा करून नेताजी आपल्या असंख्य अनुयायींसह देशाचे पारतंत्र्य नाहीसे करण्यासाठी जीवात जीव असेपर्यंत तन-मन धनाने झटत राहीन. गांधी बोस यांच्यामध्ये मुख्य मतभेद होता.तो मवाळ जहाल विचारसरणीचा. गांधीजींना आपण आज ना उद्या अहिंसात्मक मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ, असा आत्मविश्‍वास वाटत होता व त्याच उद्देशाने त्यांनी देशभरातील अगणित देशभक्तांना जवळ करून स्वातंत्र्यचळवळ सक्रिय केली होती. याउलट नेताजी बोस यांनी देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शस्त्र हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणून त्यादृष्टिने व्यूहरचनाही केली होती.हे सर्व खरे असले तरी नेताजींच्या मनात महात्मा गांधीजींबद्दल अतीव आदर होता.त्या आदरापायीच त्यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते.देश स्वातंत्र्यासाठी परदेशातून सशक्त क्रांतीत झोकून देताना २ ऑक्टोबर १९४३ साली गांधीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाठविलेल्या संदेशात म्हटले होते, आज गांधीजींची जयंती, पुण्यतिथी असली की, त्यांच्या विचारांचा मागोवा घेणारी भाषणे होतात.ते दोन दिवस गेले की, मग लोकांना गांधीजींचा आणि त्यांच्या विचारांचा विसर पडू लागतो.गांधीजींबद्दलची जिज्ञासा, जिव्हाळा त्यांच्या अमौलिक विचार वैभवात आहे.याचा जोपर्यंत आपण गंभीरपणे विचार करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला गांधी दर्शन होणार नाही.

तिसरे महायुद्ध भडकले, तर काय करायचे याचा रशिया, चीन, जपान, ब्रिटन हे देश मुत्सद्दीपणे विचार करीत असतानाचे जगातील काही शांतताप्रिय देश गांधीजींचा मार्ग अवलंब व महायुद्धाची गडद छाया दूर हटवा, अशी मागणी करू लागले आहेत. ‘महायुद्ध की महाशांती’ या विचाराने जागतिक विचारवंतही दिडमूढ झाले असल्याचे भेसूर चित्र आज दिसत आहे.

गांधीजींनी कुठलाही आडपडदा न ठेवता जे ‘सत्याचे प्रयोग’ हे आात्मचरित्र लिहिले त्यात बऱ्या-वाईट गोष्टींचा मागोवा आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर ‘बापूंच्या आठवणी’ हे ग्रंथ लिहीले प्रकाशित केलेले आणि अरुण शेवते यांनी संपादित केलेले पुस्तक खूप काही सांगून जाते. त्यांच्याच अंकामधून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एकूण सात लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक गांधीजींबाबत विपुल लेखन आणि त्यांच्या ‘हिंदवी स्वराज’ या जगप्रसिद्ध ग्रंथाचा अनुवाद करणाऱ्या रामदास भटकळ यांचे दोन व लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडात्मक महाग्रंथाचे बहुआयामी लेखक सदानंद मोटे यांचा अशा तीन स्वतंत्र लेखांबरोबरच रवींद्र पिंगे, सविता दामले, टी.एन. परदेशी व अंबरीश मिश्र यांनी अनुवादित केलेले चार लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. विद्यार्थी दशेपासून महात्मा बनेपर्यंतचा इत्यंभूत इतिहास यांतून आपल्याला वाचायला मिळतो व मोहनदास करमचंद गांधी नावाचा अत्यंत साधा, भित्रा विद्यार्थी देशाच्या राष्ट्रपितापदापर्यंत कसा पोहोचला याचा जिवंत इतिहास आपल्या लक्षात येतो. तसेच डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘गांधी : पराभूत राजकारणी विजयी महात्मा’ या आपल्या पुस्तकात म्हटले आहे की’ गांधीजींचे एक वैशिष्ट्य असे होते की, ते डॉ. आंबेडकरांच्या टीकेच्या माऱ्याचे कधी रागावले नाहीत, ना कधी चिडले, उलट त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात अस्‍पृश्‍‍यता निवारण्यास सर्वाधिक महत्त्‍व दिले. अस्‍पृश्‍‍यतेचा प्रश्‍न विकालात काढण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत. यासाठी ते कार्यक्रम आखू लागले. ३ जानेवारी १९३३ रोजी गांधीनी तुरुंगातून एक पत्रक काढले. त्यात हिंदूंना जे हक्क आहेत ते सर्व हक्क अस्‍पृश्‍‍यांनाही मिळाले पाहिजेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जिज्ञासूंना व अभ्यासकांना खरे गांधीजी कळावेत म्हणून हे सांगितले.

ज्या गांधीजींनी दलिताला हरिजन म्हणजे ‘देवाची लेकरे’ संबोधले त्याचीही नंतर थट्टा झाली व ती जणू शिवीच बनली. ‘हरिजन’ म्हणून त्यांनी भंगीमुक्ती, अस्‍पृश्‍‍यता निवारण, दलितोद्धारासाठी विपूल लेखन तर केले, पण त्याच्या कार्यवाहीसाठी स्वतः हिरीरिने कार्यरत राहिले. देशाच्या स्वातंत्र्यापासूनच्या चळवळीपासून ते देशाच्या जडणघडणीपर्यंत देशातील अशिक्षित अर्धशिक्षित, सुशिक्षित संस्कारी, सामान्य, अतिसामान्य ते असामान्यांपर्यंत सर्वांना शांततेच्या, सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने स्त्री पुरुषांपासून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे महात्मा गांधीजी हे एक अजब व अनाकलनीय रसायन होते.

 

संबंधित बातम्या