Goa Ganpati Visarjan: ढोलताशांच्या गजरात 'मडगावच्या राजा'ला निरोप

21 दिवसीय बाप्पाचे खारेबांध तळीत विसर्जन..
Margao Ganpati Visarjan
Margao Ganpati VisarjanDainik Gomantak

Goa Ganpati Visarjan: समर्थगड-दवर्ली येथील मडगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या 21 दिवसीय गणपतीचे विसर्जन खारेबांध तळीत काल उत्साहाने करण्यात आले. यावेळी स्थनिक मुलांनी ढोलताशांची कला सादर केली. समर्थगडपासून सायंकाळी 4.30 वाजल्यापासून गणपती विसर्जन मिरवणुकीला दवर्ली येथून प्रारंभ करण्यात आला. बाप्पांचा रथ आकर्षक फुलांनी सजविलेला होता.

मिरवणूक गणपती पूजनाच्या ठिकाणाहून सुटल्यानंतर मारुती मंदिर चौक, पॉवरहाऊस, पांडव कपेल, सिने विशांत, हरी मंदिर, पिंपळकट्टा परिसर, खारेबांद या ठिकाणी गणरायाचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी काही ठिकाणी महिलांनी श्रींचे औक्षण करून पूजन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या स्थानिक दिंडी पथकाने गजरांचा जयघोष केला.

मिरवणूक मडगाव शहराच्या ठिकाणी पोहोचली असता येथील व्यापाऱ्यानी आतषबाजी करत गणेशाचे स्वागत केले. यानंतर रात्री 12 वाजता या गणपतीचे खारेबांद येथील तळीत विसर्जन करण्यात आले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com