Ganesh Chaturthi: फटाके लावा पण मर्यादित स्वरूपात

Ganesh Chaturthi: आतषबाजी तर नकोच, फोंड्यातील सार्वजनिक मंडळांचे गणेशभक्तांना आवाहन
Ponda Ganesh Festival
Ponda Ganesh FestivalDainik Gomantak

Ganesh Chaturthi: राज्यातील घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवातील काही मंडळांकडूनही चतुर्थी काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे लाखो रुपयांची उधळपट्टी तर होतेच, शिवाय प्रदूषण आणि ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना त्रास होतो. पण फोंडा शहरातील काही गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेशोत्सवातही मर्यादित फटाके लावण्यावरच भर दिला जात आहे.

Ponda Ganesh Festival
Goa Ganesh Festival: गोव्यात गणेशोत्सवाच्या सजावटीच्या कामांना वेग

फटाके केवळ नावापुरते लावा, आतषबाजी तर नकोच, असा संदेश या मंडळांकडून दिला जातो. त्यात फोंड्यातील सदर गणेशोत्सव मंडळाचा वरचा क्रमांक लागतो. या मंडळाकडून सामाजिक उत्तरदायित्व निभावले जात असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

* सदर गणेशोत्सव मंडळाचा आदर्श

फोंड्यातील (Ponda) सर्वांत जुन्या आणि प्रथम ठरलेल्या सदर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील देसाई यांनीही मर्यादित फटाक्यांच्या वापराचे आवाहन केले आहे. मंडळातील सर्वच पदाधिकारी या मर्यादित फटाके वापरावर ठाम असून प्रदूषण टाळण्यासाठी आणि आगीच्या दुर्घटनांना चार हात लांब ठेवण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय मंडळाने घेतला असून इतरांनीही त्याचे अनुकरण करावे, असे मत सर्वच पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Ponda Ganesh Festival
Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला अशा प्रकारे करा सजावट

* केवळ फटाक्यांवर 50 लाखांचा खर्च

केवळ फोंडा तालुक्यात गणेशोत्सव (Ganesh Festival) काळात किमान 50 लाख रुपयेफटाक्यांवर खर्च केले जातात. मग पूर्ण राज्याचा विचारच न केलेला बरा. त्यातून प्रदूषण आणि जळिताच्या दुर्घटना उदभवतात. 2019 मध्ये फोंडा तालुक्यात ऐन चतुर्थीच्या काळात सहा ठिकाणी लोकांना भाजण्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यात लहान मुलांचा समावेश होता. त्यामुळे फटाके मर्यादित वाजवा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com