Gauri Ganesh Festival: आज घरोघरी अवतरणार 'गौरी'

Gauri Ganesh Festival: राज्यात बहुतांश ठिकाणी घरातील गणेश उत्सव हा पाच दिवसांचा असतो आणि पाचव्या दिवशी गौरीचे पूजन केले जाते
Gauri Ganesh Festival
Gauri Ganesh Festival Dainik Gomantak

Gauri Ganesh Festival: राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सर्वत्र उत्साहाचे आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी घरातील गणेश उत्सव हा पाच दिवसांच्या असतो. पाचव्या दिवशी गौरीचे पूजन केले जाते. तसेच पाच दिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जनही रविवारी होणार आहे.

Gauri Ganesh Festival
गोव्यात ख्रिश्चन-हिंदू परंपरेचा मिलाप, गणेशाची मनोभावे पूजा; 5 दिवस मांसाहाराचाही त्याग

गौरी पूजनासाठी सुवासिनी नदी, विहिरीवर जाऊन तेथे कलशात पाणी भरून त्यावर श्रीफळ, आंब्याची डहाळी तसेच नथ व मंगळसूत्र व इतर दागिने घालून श्रृंगारले जाते व या कलश गौरीच्या स्वरूपात घरांमध्ये आणला जातो त्यावेळी दराात या कलशाला ओवाळले जाते. चंदन किंवा गंध उगाळून सुवासिनी जेथे-जेथे पाय ठेवणार आहेत तेथे हे चंदन लावले जाते जेणेकरून पदचिन्ह उमटेल.आपल्या घरात गौरी येत असल्याचे हे प्रतिक असते. राज्यातील सत्तरी, डिचोली, पेडणे व इतर भागांत अशा प्रकारे गौरीचे आगमन होते.

Gauri Ganesh Festival
केळबाय कुर्टीचा माटोळीतील 'वराह अवतार' ठरतोय आकर्षणाचे केंद्र

* औंशे आणि गौरीची भाकर

गौरीला औंशाचा नैवेद्य दाखविला जातो. लग्नानंतर ज्यांची पहिली चतुर्थी असते त्या सुवासिनींच्या घरी विशेष औंशे असतात. औंशे हळदीच्या पानावर भरले जातात ज्यात प्रामुख्याने विविध प्रकारच्या फळांचे तुकडे, वडा (पुरीचा एक प्रकार) व इतर जिन्नस असतात. हे औंशे आपल्या गावातील मंदिरातदेखील सुवासिनी ठेवून देवतांचा आशीर्वाद घेतात व नंतर सर्वांना हे वाटले जातात.

गौरीचे विसर्जन केल्यानंतर पाच प्रकारच्या भाज्या एकत्रित करून केलेली भाजी व भाकरी सर्वांना वाटली जाते ज्याला गौरीची भाकर असे संबोधले जाते. गौरी विसर्जनानंतर ज्यांच्या घरी पाच दिवसांचे गणपती आहेत, त्यांचे विसर्जन करण्यात येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com