वन येथे गणेशजयंती उत्साहात साजरी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

आमदार झांट्ये यांनी घेतले गणरायाचे दर्शन

डिचोली: गणेश जन्मसोहळा, पाळणागीत आदी कार्यक्रमांनी आणि शेकडो गणेशभक्‍तांच्या साक्षीत डिचोलीतील नवीनवाडा-वन येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात आज गणेश जयंती पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शेकडो गणेशभक्‍तांनी उत्सवात सहभागी होताना पाळण्यातील बाल गणरायाचे दर्शन घेऊन श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनीही मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा अंकिता न्हावेलकर, वन-म्हावळिंगेची सरपंच शीतल सावळ आदी उपस्थित होते.

सकाळी देवस्थानात विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. दुपारी गणेशजन्म सोहळा आणि पाळणागीत सादर करण्यात आले. नंतर महाआरती, तीर्थपसाद, आणि महाप्रसाद झाला.

संबंधित बातम्या