मिरामार किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पणजी:स्वच्छतेकडे दुर्लक्ष:अनेक संस्थांकडून स्वच्छतेचा दिखावा

पणजी:स्वच्छतेकडे दुर्लक्ष:अनेक संस्थांकडून स्वच्छतेचा दिखावा

मिरामार किनाऱ्यावर अनेक संस्था अधून-मधून स्वच्छता मोहीम राबवितात. परंतु ज्या ठिकाणी कचरा आहे, तो उचलला जात नसल्याचे दिसून आले आहे.यथील शौचालयाच्या मागील बाजूस कचऱ्याच्या राशी लागल्या असून, नेमका हा कचरा कोणी टाकला, याविषयी आता प्रश्‍न उपस्थित होत आहेत.
मिरामार किनाऱ्यावरील शौचालयाच्या मागील बाजूस असलेल्या झाडीत पोत्यात भरून कचरा ठेवण्यात आला आहे.त्याशिवाय इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेला असून, तो वेळच्यावेळी उचलला जात नाही. किनाऱ्यांची साफसफाईच्या निविदेवरून मध्यंतरी मोठा वाद उफाळला होता.परंतु ज्यांच्याकडे किनारा स्वच्छतेचे काम आहे, त्यांच्याकडून खरोखरच योग्य पद्धतीने किनाऱ्याची स्वच्छता होतेय की नाही, हे पर्यटन खाते का पाहत नाही.पर्यटन खात्याला समांतर असे महामंडळसुध्दा निर्माण झाले आहे, पण किनाऱ्याच्या स्वच्छतेविषयी हे खाते खरोखरच गंभीर दिसत नाही.
शौचालयामागे प्लास्टिकच्या पिशव्या भरून कचरा टाकण्यात आला आहे.काही ठिकाणी कचऱ्याच्या राशी लागल्या आहेत, त्याशिवाय काही नतद्रष्ट नागरिक घरातील कचरा याठिकाणी आणून टाकत असावेत, असे कचऱ्याच्या पिशव्या पाहिल्यानंतर दिसून येते.परंतु काही झाले तरी किनाऱ्याची स्वच्छता ही महत्त्वाची आहे. या किनाऱ्यावर अनेक सामाजिक संस्था, कंपन्या सामाजिक उपक्रमाशी आम्ही बांधिल आहोत, हे दर्शविण्यासाठी स्वच्छता अभियान राबवितात.ज्या ठिकाणी खरोखरच कचरा आहे, तो उचलला जात नसल्याचे हा कचरा पाहून प्रथमदर्शनी तरी स्पष्ट दिसते.

विर्डी दोडामार्ग येथे वीज वहिनी पडून महिलेचा मृत्यू

मिरामार किनाऱ्यावरील स्वच्छतेचे काम करण्यास तयार असल्याचे पर्यटन खात्याला महापालिकेने कळविले होते, परंतु पर्यटन खात्याने महापालिकेकडे स्वच्छतेचे काम सोपविले नाही.त्यामुळे मिरामार किनाऱ्यावर कचरा दिसला की महापालिकेला जबाबदार धरले जाते.परंतु पर्यटन खात्याने स्वच्छतेचे काम निटनेटके होतेय की नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे.पण खात्याकडून तसे काहीच होताना दिसत नाही.                      - उदय मडकईकर, महापौर 

संबंधित बातम्या