साकोर्डा येथे गॅस जोडणीचे वितरण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

तांबडीसुर्ला: देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गॅस जोडणीचा लाभ मिळवून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि खासदार निधी यांच्या सहकार्याने ग्रामीण ऊर्जा योजना राबविण्यात येत असून प्रत्येक घरात गॅस जोडणीचा लाभ मिळवून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारच्या वेगवेगळया योजना आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पंचायत मंडळ आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी साकोर्डा येथे केले.

साकोर्डा पंचायत कार्यालय सभागृहात आयोजित केलेल्या गॅस जोडणी वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, सरपंच जितेंद्र नाईक, उपसरपंच नेहा कालेकर, पंच शिरीष देसाई, गौतम सावंत, दिनानाथ गावकर, विंदा सावंत यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

यावेळी सरपंच जितेंद्र नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. या योजनेंतर्गत १४ लाभार्थ्यांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. दिनानाथ गावकर यांनी सूत्रसंचालन, शिरीष देसाई यांनी आभार मानले.

पशुखाद्य किंमतीत केलेली दरवाढ मागे घ्यावी

संबंधित बातम्या