बाणावलीत युवतीचा खून

Dainik Gomantak
शनिवार, 25 एप्रिल 2020

मेलबर्न याने कोलवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यावर जेनिफर हिचा खून झाल्याचे उघडकीस आले.

सासष्टी

प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना काल रात्री प्रियकर मेलबर्न रोड्रिगीस (बाणवली)याने कोलवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यावर उघडकीस आली. कोलवा पोलिसांनी मोंते बाणवली येथून मृत युवती जेनिफर गोनसाल्वीस हिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. कोलवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेलबर्न रोड्रिगीस हा काल दुपारी कोंब मडगाव येथे असलेल्या जेनिफर गोनसाल्वीस हिच्या घरी आला व तिला घेऊन बाणवली येथे गेला. मेलबर्न सोबत गेलेली मुलगी घरी न परतल्याने पालकांनी दोघांनाही मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. रात्री मेलबर्न याने कोलवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यावर जेनिफर हिचा खून झाल्याचे उघडकीस आले. मेलबर्न याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने बनियनच्या साहाय्याने गळा आवळून खून केला आहे. जेनिफर हिचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी कोलवा पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

 

 

 

संबंधित बातम्या