अॅथलेटिक्स स्पर्धेत मुलींच्या केपे संघाची चमकदार कामगिरी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

फातोर्डा:गोवा विद्यापिठाने हल्लीच आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयिन अॅथलेटिक्स स्पर्धेत केपे येथील सरकारी कॉलेजच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. रोहिणी गावकर, दिप्ती गावकर, कविता देविदास, हरिचंद्रा वेळीप यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे सरकारी कॉलेज केपेच्या मुलींच्या संघाला चांगली कामगिरी करता आली.

रोहिणी गावकरने ५००० मी. धावण्याच्या शर्यतीत २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढताना सुवर्ण पदक जिंकले. रोहिणीने १५०० मी. धावण्याच्या शर्यतीतही सुवर्ण पदकाला गवसणी घातली.दिप्ती गावकरने ८०० मी. मध्ये सुवर्ण तर ४०० मी. मध्ये रौप्य पदक जिंकले.कविता देविदासने रौप्य व हरिचंद्राने ४०० मी अडथळ्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले.
या महाविद्यालयाची या स्पर्धेतील इतर उल्लेखनीय कामगिरीत, १०० मी. महिला रिलेमध्ये कांस्य पदक (कविता देविदास, दिप्ती वेळीप, तन्वी देविदास व वैभवी गावकर). ४०० मी. पुरूष रिलेमध्ये कांस्य पदक (एलन वाझ, ग्राविलो लिमा, हरिचंद्र वेळीप, कल्पनाथ गावकर). १०० मी. पुरूष रिलेमध्ये कांस्य पदक (एल्ड्रिन मास्कारेन्हस, तुषार गावकर, एलन वाझ, कल्पनाथ गावकर).
या स्पर्धेत गोव्यीतील १००० महाविद्यालयीन अॅथलिट्सनी भाग घेतला व १० विक्रमांची नोंद झाली. सरकारी कॉलेज केपे संघाने एकुण १८ पदके जिंकली. यांत ३ सुवर्ण, २ रौप्य व १३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या