‘आरोग्य सेतू’ मुळे कोरोना चाचणी करण्यास मदत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक; नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा
भारत सरकारच्या आरोग्य सेतू मोबाईल ॲपमुळे देशातील आरोग्य यंत्रणेला कोरोना महामारीचा जास्त फैलाव झालेले विभाग (क्‍लस्टर) आणि कोरोना चाचण्यांसाठी मोठी मदत होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे

नवी दिल्ली:  जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक; नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा
भारत सरकारच्या आरोग्य सेतू मोबाईल ॲपमुळे देशातील आरोग्य यंत्रणेला कोरोना महामारीचा जास्त फैलाव झालेले विभाग (क्‍लस्टर) आणि कोरोना चाचण्यांसाठी मोठी मदत होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.

हा ॲप डाउनलोड करणे सरकारी कर्मचारी तसेच रेल्वे स्थानके, विमानतळे आदींमध्ये सक्तीचे केल्याने चो चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर केंद्र सरकारने याबाबतच्या प्रत्येक उल्लेखात आरोग्य सेतू डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, अशी सुधारणा केली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या अधिवेशनात सांगितले होते, की भारतात कोरोना लसीचे उत्पादन व पुरवठा संपूर्ण मानवतेच्या व कोविड १९ महामारीशी लढणाऱ्या देशांना मदतीसाठी केला जाईल, असे आश्‍वासन जागतिक समुदायास देतो. त्यांच्या या भूमिकेची प्रशंसा डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी प्रशंसा केली आहे.

नवीन रुग्णसंख्येत मोठी घसरण 
देशात गेल्या दोन दिवसांपासून नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली आहे. देशात आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५,३४२ नवे रूग्ण आढळले. काल (सोमवारी) नवीन रुग्णसंख्या ६६,७३२ होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या एकूण रुग्णसंख्या ७१,७५,८८१ आहे. सक्रिय रुग्णसंख्या तर ८,३८,७२९ म्हणजे १० लाखांच्याही खाली आली आहे. आतापर्यंत ६२,२७,२९६ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांची संख्या १,०९,८५६ वर पोहोचली आहे.
 

संबंधित बातम्या