myanmar
myanmar

म्यानमारमध्ये भूस्खलनात 100 जणांचा मृत्यू

यांगून

म्यानमारच्या उत्तरेकडे एका हिऱ्याच्या खाणीत भूस्खलनामुळे शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काचीन राज्यातील हापिकांतमध्ये गुरूवारी ही घटना घडल्याचे म्यानमारच्या माहिती व सूचना खात्याने सांगितले. हा भाग चीनच्या सीमेपासून जवळ आहे.
म्यानमारचे सर्वात मोठे शहर असलेल्या यांगूनमध्ये ही खाण 950 किलोमीटर परिसरात व्यापलेली आहे. तसेच हे ठिकाण जगातील सर्वात मोठे हिऱ्यांच्या उद्योगाचे केंद्र आहे. सुरूवातीला एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार येथून 200 जण बेपत्ता झाल्याचे आणि 50 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर स्थानिक अग्निशामक विभागाने फेसबुकवरून अधिकृतपणे 113 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. घटनास्थळाचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला असून, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि अनेकजण भूस्खलनात येथील कर्मचारी गाडले गेल्याची माहिती देण्यात आली. याठिकाणी कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दुपारपर्यंत 99 मृतदेह येथून बाहेर काढण्यात आले होते.
ही घटना जोराच्या पावसामुळे घडली. याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगारांकडून कमी मोबदल्यात खाणीतील कामे करून घेतली जातात. मागील वर्षी याठिकाणच्या दुर्घटनेत 50 कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता तर, 2015 मध्ये भूस्खलनातच 100 जण ठार झाले होते.

अग्निशामक दलाला झापले
भूस्खलनाची घटना घडल्यानंतर म्यानमार सरकारने 50 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र, दुपारपर्यंत 99 जणांचे मृतदेह अग्निशामक दलाने बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून 113 जण गेल्याचे सांगितले. त्यामुळे म्यानमार सरकारने स्थानिक अग्निशामक दलाला यावरून चांगलेच झापले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com