Thailand: भारतीय महिलांच्या बॅगमध्ये सापडले जिवंत साप, सरडे, कासवांसह 109 प्राणी

थायलंडच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर भारतीय महिलांना अटक केली.
109 animals found in Indian women bags at Thailand airport
109 animals found in Indian women bags at Thailand airportTwitter

थायलंडच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर (Suvarnabhumi Airport) भारतीय महिलांना अटक केली. या महिलांवर 109 जिवंत प्राण्यांची तस्करी केल्याचा आरोप आहे. एका प्रसिद्धीपत्रकात, थायलंडच्या राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागाने सांगितले की, या महिलांच्या सुटकेसमधून एक्स-रे तपासणीदरम्यान 109 प्राणी आढळले. त्यांना दोन पांढरे पोर्क्युपाइन्स, दोन आर्माडिलो सापडले. या प्राणांच्या कातडीपासून बुलेटप्रूफ जॅकेट बनवले जातात. याशिवाय त्यांच्या सुटकेसमधून 35 कासव, 50 सरडे आणि 20 सापही सापडले आहेत. (109 animals found in Indian women bags at Thailand airport)

109 animals found in Indian women bags at Thailand airport
UAE नंतर या मुस्लिम देशात बांधले जाणार हिंदू मंदिर, PM मोदी राहणार उपस्थित

थायलंडच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, ही सुटकेस नित्या राजा आणि झाकिया सुलताना इब्राहिम दोन भारतीय महिलांची होती. त्या चेन्नईला जाण्यासाठी विमानतळावर आल्या असता हे प्रकरण उघडीस आले. वन्यजीव संरक्षण आणि बचाव कायदा 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. यासोबतच त्याच्यावर प्राणी रोग कायदा 2015 आणि कस्टम अॅक्ट 2017 चे उल्लंघन केल्याचा गुन्हाही दाखल आहे.

109 animals found in Indian women bags at Thailand airport
अमेरिकेचा मोठा दावा - अल कायदाचा वरिष्ठ दहशतवादी अबू हमजा सीरियात ड्रोन हल्ल्यात ठार

भारतातील संशयित प्राण्यांची सुटका केल्यानंतर किंवा सुटकेसमध्ये असलेल्या प्राण्यांचे काय झाले हे अधिकाऱ्यांनी उघड केले नाही. विमानतळावरून प्राण्यांची तस्करी करणे असे गुन्हे हा या भागात बऱ्याचदा घडतात. 2019 मध्ये, एक व्यक्ती बँकॉकहून चेन्नईला आली होती, ज्याला विमानतळ सीमाशुल्क विभागाने कथितरित्या पकडले होते. त्याच्या सामानातून एक महिन्याचे चित्त्याचे पिल्लू सापडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com