बीचवर जोरदार पार्टी केली, व्हिडिओ Tik-Tok वर टाकला अन् 149 जणांना अटक

 California Beach
California Beach

California beach party Viral video TikTok: कोरोना महामारीचा(Covid-19) जगभर प्रसार झाला आहे. आणि या माहामारीचे वाईट परिणाम संपूर्ण जग अजूनही भोगत आहे. काही देशांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र अद्यापही चिेतेची बाब कमी झाली नाही. त्यामुळे कोरनाच्या त्रिसुत्री मियमांचे पालन करणे अजूनही गरजेचं आहे. त्यामुळेच सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र कडक निर्बंध असतानाही काही ठिकाणी लोक नियमांचा फज्जा उडवितांना दिसत आहे. नियम धाब्यावर ठेवून आपली मनमानी करत असल्याचे अनेक प्रकार जगात घडत आहेत.(149 arrested for partying on Huntington Beach California)

कॅलिफोर्नियामधील (California) अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी शेकडो लोकांनी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत कोरोनाच्या नियमांची वाट लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ TikTok वर व्हायरल झाल्यानंतर कॅलिफोर्निया पोलिसांनी कारवाई करत 150 जणांना अटक केली. 

पार्टीचा व्हिडिओ TikTok वर व्हायरल

शनिवारी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या हंटिंगटोन बीचवर वाढदिवसाच्या पार्टीला शेकडो तरुण-तरुणी जमले होते. पार्टीमध्ये कोरोना नियमांचा विसर पडल्याचं निदर्शनास आलं. या पार्टीचा एक व्हिडिओ TikTok वर व्हायरल झाला. या व्हिडिओला 180 मिलियन लोकांनी पाहिलं. हा व्हिडिओ सद्या TikTok वरुन डिलीट करण्यात आला आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॅलिफोर्निया प्रशासनाला जाग आली. त्यांनी तात्काळ कारवाई करत तब्बल 150 जणांना ताब्यात घेतलं. बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

पार्टीला जवळपास 400 जण उपस्थित

adrian.lopez517 या युजर्सनं आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ TikTok वर अपलोड केला होता. adrian.lopez517 ने सर्वांना आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी हंटिंगटोन बीचवर आपल्या मित्रांना शनिवारी रात्री आमंत्रित केलं होतं. पार्टीला गेलेल्या एका व्यक्तीनं New York Times ला सांगितलं की, कोरोना लॉकडाउननंतर अशाप्रकारची ही पहिलीच मोठी पार्टी आहे. पार्टीला जवळपास 400 जण उपस्थित होते.

"बिचवर पार्टीसाठी जमलेल्या पार्टी प्रेमींनी फटाके फोडण्यासाठी सुरुवात कोली. पोलिसांनी त्यांना गर्दी कमी करण्याच्या सूचना केल्या. मात्र, लोकांनी न एकता पार्टी सुरुच ठेवली. त्यामुळे नाईलाजास्तव हा प्रकार बेकायदेशीर असल्याचं घोषीत करत कॅलिफोर्निया पोलिसांना त्याच्यावर कारवाई करावी लागली," असं पोलिस आधिकारी ब्रायन स्मिथ यांनी सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com