भारतीय वंशाच्या 'गीतांजली राव'ला जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकातर्फे ‘किड ऑफ दि इयर' पुरस्कार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

भारतीय अमेरिकी वंशाची युवा संशोधक गीतांजली राव (वय १५) जगप्रसिद्ध टाइम या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. संशोधन कार्यातील भरीव योगदानाबद्दल तिला ‘किड ऑफ दि इयर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. 

न्यूयॉर्क :  भारतीय अमेरिकी वंशाची युवा संशोधक गीतांजली राव (वय १५) जगप्रसिद्ध टाइम या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. संशोधन कार्यातील भरीव योगदानाबद्दल तिला ‘किड ऑफ दि इयर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. 

नव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल तिचा गौरव करण्यात आला. या सन्मानासाठी तब्बल पाच हजार जणांना नामांकन देण्यात आले होते, त्यातून गीतांजली राव हिची निवड करण्यात आली. टाइम या नियतकालिकानेच मध्यंतरी विशेषांक प्रसिद्ध केला होता, त्यासाठी तिने अँजेलिना जोली हिची मुलाखत घेतली होती. जलप्रदूषण, तरुणाईमधील अमली पदार्थांचे व्यसन आणि सायबर छळवणूक आदी समस्यांचा सामना करण्यासाठी तिने तंत्रज्ञानाचा प्रभावीरितीने वापर केला होता.
 

अधिक वाचा :

कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचा संबंध आणखी एका भारतीय कैद्याशी जोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

संबंधित बातम्या