भारतीय वंशाच्या 20 व्यक्तींचा बायडेन प्रशासनात सहभाग

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

कमला हॅरिस यांच्या रुपाने पहिल्यांदा अमेरीकेला  महिला  उपाध्यक्ष   मिळाल्या  आहेत. तसेच  व्हाइट  हाउसमध्ये  प्रथमच  भारतीय  अमेरिकी  व्यक्तींपैकी  काश्मिरी  आयशा  शहा  यांची  नेमणूक  करण्यात  आली  आहे.

वाशिंग्टन :   येत्या  20  जानेवारीला  अमिरिकेला  नवनिर्वाचीत  राष्ट्राध्यक्ष  जो  बायडेन   यांचा  शपथविधी  सोहळा  पार  पडणार  आहे. त्यांच्या  प्रशासनात  20  भारतीय  अमेरिकी व्यक्तींचा  समावेश  करण्यात  आला आहे. त्यात  13   महिलांचा  समावेश  आहे  तर महत्वाच्या  पदावर  एकूण  17  जणांचा  समावेश  करण्यात  आला  आहे.

महत्वाचे  म्हणजे  कमला   हॅरिस यांच्या रुपाने पहिल्यांदा अमेरीकेला  महिला  उपाध्यक्ष   मिळाल्या  आहेत. तसेच  व्हाइट  हाउसमध्ये  प्रथमच  भारतीय  अमेरिकी  व्यक्तींपैकी  काश्मिरी  आयशा  शहा  यांची  नेमणूक  करण्यात  आली  आहे.

तसेच   समिरा  फाझिली  यांंना  देशाच्या  राष्ट्रीय अर्थमंडळात  उपसंचालक  पद  देण्यात  आलं  आहे. नीरा  टंडन,  विवेक  मूर्ती,  वनिता गुप्ता, उझरा झेया,  माला  अडिगा  यांची  प्रथम  महिला  डॉ  जिल  बायडेन  यांच्या सचिवपदी  नेमणूक  करण्यात  आली  आहे. बायडेन  यांच्या  प्रशासनात  भारतीय  वंशाच्या व्यक्तींचा  बोलबाला  निर्माण  झाला  आहे.

संबंधित बातम्या