Canada Hate Crime: धर्मद्वेशाने घेतला 4 लोकांचा बळी, 2017 नंतरचा सर्वात मोठा हल्ला

Canada Hate Crime: धर्मद्वेशाने घेतला 4 लोकांचा बळी, 2017 नंतरचा सर्वात मोठा हल्ला
Muslims in Canada

टोरोंटो: कॅनडामधील एक मुस्लिम कुटूंब हेट क्राइमचे बळी पडले आहे. रविवारी या घटनेत कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर एक नऊ वर्षांचा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झगडत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुध्द फर्स्ट डिग्री हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुसलमानांचा द्वेष करतात, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे त्याने हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्या दिवशी काय झाले?
रविवारी आरोपींने आपल्या पिकअप ट्रकने मुस्लिम कुटुंबियांना जाणुनबूजून ट्रकखाली तुडवले. या घटनेत एका 74 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. एक 46 वर्षीय व्यक्ती, 44 वर्षीय महिला आणि एक 15 वर्षाची मुलगी रुग्णालयात जात असताना मृत्यू पावली. कुटुंबातील नऊ वर्षाच्या मुलाची गंभीर प्रकृती असून त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपी लंडनचा रहिवासी आहे
पोलिसांनी रविवारीच 20 वर्षीय संशयित हल्लेखोर नॅथॅनियल वेल्टमन याला अटक केली. तो मूळचा लंडनचा आहे. त्याच्याविरोधात फर्स्ट डिग्री मर्डर आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा द्वेष-गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला मुस्लिम आवडत नाहीत. कदाचित म्हणूनच त्याने हा गुन्हा केला आहे, असेही पोलिसांनी सांगितली.

2017 नंतरचा सर्वात मोठा हल्ला
या घटनेचे वर्णन 2017 नंतर मुस्लिमांवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. 2017 मध्ये क्यूबेक शहरातील मशिदीतील सहा सदस्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. त्याचबरोबर लंडनचे पोलिस प्रमुख स्टीफन विल्यम्स यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, 'आम्हाला वाटते की ही मुद्दाम केलेली कृती आहे. आमचा विश्वास आहे की मृतांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केले गेले आहे.'
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com