नायजेरियाच्या कारागृहातून 2 हजार कैदी फरार

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

नायजेरियाच्या आग्नेय भागात, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी पोलिस आणि सैन्याच्या इमारतींवर हल्ला केला, त्यानंतर तेथील कारागृहातून सुमारे 2 हजार कैदी फरार झाले.

नायजेरियाच्या आग्नेय भागात, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी पोलिस आणि सैन्याच्या इमारतींवर हल्ला केला, त्यानंतर तेथील कारागृहातून सुमारे 2 हजार कैदी फरार झाले. हल्ल्यानंतर अनेक कैदी तुरूंगातून पळून गेल्याची माहीती अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितली.

स्थानिक व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, सोमवारी पहाटे ओव्हरी शहरात हा हल्ला झाला आणि दोन तास हा प्रकार सुरू राहिला. शस्त्रधारी हल्लेखोरांनी  एकाच वेळी अनेक सरकारी इमारतींचे नुकसान केले. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु नायजेरियाच्या पोलिस महानिरीक्षकांनी त्यासाठी अलगाववाद्यांना जबाबदार धरले. या कारागृहात 1800 हून अधिक कैदी होते. 

बांगलादेशातील नौका अपघातात 26 जणांचा मृत्यू

नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मू बुहारी हे आरोग्य समस्येच्या कारणास्तव सध्या 2 आठवड्यांसाठी लंडनमध्ये  आहेत आणि तेथून झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हटले आहे. घटनेनंतर जवळच्या दोन शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या महिन्यात हल्लेखोरांनी कमीतकमी सहा पोलिसांचा बळी घेतला आहे. 

संबंधित बातम्या