२०२१ अधिक धोकादायक ; भुकेचा प्रश्‍न होणार बिकट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

यंदाच्या वर्षापेक्षा पुढील २०२१ हे वर्ष अधिक धोकादायक ठरणार असून अब्जावधी डॉलरचे साह्य झाल्याशिवाय संभाव्य आपत्तीचा आपण सामना करू शकत नाही, असा इशारा जागतिक अन्न कार्यक्रमाचे (डब्लूएफपी)अध्यक्ष डेव्हीड बिस्ली यांनी दिला आहे.

न्यूयॉर्क : यंदाच्या वर्षापेक्षा पुढील २०२१ हे वर्ष अधिक धोकादायक ठरणार असून अब्जावधी डॉलरचे साह्य झाल्याशिवाय संभाव्य आपत्तीचा आपण सामना करू शकत नाही, असा इशारा जागतिक अन्न कार्यक्रमाचे (डब्लूएफपी)अध्यक्ष डेव्हीड बिस्ली यांनी दिला आहे. हा इशारा सर्व जागतिक नेत्यांपर्यंत पोहोचवता यावा, यासाठीच नोबेल समितीने जागतिक अन्न कार्यक्रमाला शांतता पुरस्कार दिला असल्याची भावना बिस्ली यांनी व्यक्त  केली. 

‘असोसिएटेड प्रेस’ने घेतलेल्या मुलाखतीत डेव्हीड बिस्ली म्हणाले की, आमची संघटना दररोज विविध संघर्षात, नैसर्गिक आपत्तींमध्ये काम करते. अनेक वेळा आमचे कर्मचारी लाखो भुकेल्यांना अन्न पुरविण्यासाठी स्वत:चा जीवही धोक्यात घालतात. मात्र, अद्यापही आमचा कस लागलेला नाही, कारण परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.

संबंधित बातम्या