काबूलमधील स्फोटात विद्यार्थ्यांसह २४ ठार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

घुसखोर आणि सरकार यांच्यात कतारमध्ये चर्चा होण्याच्या सुमारासच हा स्फोट झाला आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, मात्र तपास यंत्रणेचा संशय तालिबानवर आहे.

काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शैक्षणिक केंद्रात झालेल्या आत्मघाती स्फोटात विद्यार्थ्यांसह २४ जण ठार झाले. घुसखोर आणि सरकार यांच्यात कतारमध्ये चर्चा होण्याच्या सुमारासच हा स्फोट झाला आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, मात्र तपास यंत्रणेचा संशय तालिबानवर आहे.

आत्मघाती हल्लेखोराला शैक्षणिक केंद्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्यावर त्याने लगेचच स्फोट घडवला. मृतांत प्रामुख्याने १५ ते २६ या वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या स्फोटात ५७ जण जखमी झाले. 
 

संबंधित बातम्या