बँक खात्यात 25 कोटी जमा झालेले दिसत होते, मात्र....

मायकेलच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
बँक खात्यात 25 कोटी जमा झालेले दिसत होते, मात्र....
Money Dainik Gomantak

एका व्यक्तीच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाल्याने तो आश्चर्यचकित झाला. खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून तो ती रक्कम कशी खर्च करायची याचे नियोजन करू लागला. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही आणि वास्तव समजल्यानंतर त्याची निराशा झाली.

Money
Xiaomi च्या अधिकाऱ्यांना करावा लागला 'शारीरिक हिंसाचाराचा' सामना, ED वर आरोप

'द सन'च्या वृत्तानुसार, हा व्यक्ती ब्रिटनचा रहिवासी असून त्याचे नाव मायकल कारपेंटर आहे. नुकताच मायकेल एका रात्रीत करोडपती झाला, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. वास्तविक, यापूर्वी मायकलने हारग्रीव्स लॅन्सडाउन या स्टॉक फर्ममध्ये 1 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली होती. अलीकडेच, एके दिवशी सकाळी उठून त्याने पाहिले की त्याच्या स्टॉकने त्याला 2,200 टक्के परतावा दिला आणि त्याची रक्कम एका रात्रीत 25 कोटींहून अधिक झाली आहे. हे पाहून मायकेल थक्क झाला. मायकेलच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मात्र अनेकवेळा खाते पाहिल्यानंतर खरोखरच 25 कोटी रुपये आल्याची खात्री पटल्यावर त्याने आनंदाने उडी घेतली.

खात्यात एवढे पैसे कसे आले?
मायकलने माहितीसाठी Hargreaves Lansdown फर्मला फोन केला. फर्मने तपासले तेव्हा कळले की त्रुटीमुळे ती रक्कम मायकलच्या खात्यात दिसत आहे. याबाबत कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, तांत्रिक चुकीमुळे ही रक्कम दिसत होती. एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.