अफगाणिस्तानात 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपात 255 ठार, 500 जखमी

बुधवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये झाला, असे यूएस जिओलॉजिकल सर्व्हे ने सांगितले आहे.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak

बुधवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये झाला, असे यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले आहे. USGS ने सांगितले की, आग्नेय अफगाणिस्तानातील खोस्ट शहरापासून सुमारे 44 किमी (27 मैल) अंतरावर भूकंप झाला आणि त्याची खोली 51 किमी एवढी होती. (255 killed 500 injured in 6 point 1 magnitude earthquake in eastern Afghanistan)

युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने सांगितले की, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतातील सुमारे 119 दशलक्ष लोकांना सुमारे 500 किमीच्या परिसरात हादरे जाणवले आहेत.

इस्लामाबाद आणि देशाच्या इतर भागांमध्ये सौम्य तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती देखील पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. लाहोर, मुलतान, क्वेटा आणि पाकिस्तानच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake
युक्रेनियन मुलांच्या मदतीसाठी रशियन पत्रकाराने केला नोबेल पुरस्काराचा लिलाव

गेल्या शुक्रवारी, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानसह अनेक पाकिस्तानी शहरांना 5.0 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. माध्यमांनुसार फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलाकंदमध्येही धक्क्यांची नोंद करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com