इस्त्रायलमध्ये सापडले 2700 वर्ष जुने लक्झरी 'टॉयलेट'

अशाप्रकारची टॉयलेट या शहरात लक्झरी जीवनाचे प्रतीक असल्याची माहिती मंगळवारी इस्त्रायली अधिकाऱ्यांनी दिली.
इस्त्रायलमध्ये सापडले 2700 वर्ष जुने लक्झरी 'टॉयलेट'
Private ToiletDainik Gomantak

इस्रायली पुरातत्त्वशास्त्रज्ञांना (Archaeologists in Israel) जेरुसलेममध्ये एक दुर्मिळ दुर्लभ टॉयलेट (Private Toilet) सापडले असून, ते 2700 वर्षांहून अधिक जुने आहे. त्या वेळी अशाप्रकारची टॉयलेट या शहरात लक्झरी जीवनाचे प्रतीक असल्याची माहिती मंगळवारी इस्त्रायली अधिकाऱ्यांनी दिली.

इस्त्रायल पुरातत्त्व प्राधिकरणाने सांगितले की, चुनखडीने बनवलेले आणि सुंदर डिझाइन असलेले शौचालय आयताकृती खोलीत सापडले आहे. शौचालय अशा प्रकारे बनवले गेले आहे की, ते बसण्यास अतिशय आरामदायक आहे. सेप्टिक टाकी खाली जमिनीत खोल खोदली गेलेली आहे.

Private Toilet
रशियामध्ये सापडला एलियन मासा

उत्खनन कार्याचे संचालक याकोव्ह बिलिग (Yakov Bilig) म्हणाले की, प्राचीन काळात खाजगी स्वच्छतागृहे अत्यंत दुर्मिळ होती. आतापर्यंत अशाच प्रकारची स्वच्छतागृहे सापडली आहेत. ते पुढे म्हणाले की, त्यावेळी केवळ श्रीमंत लोकच अशा प्रकारची शौचालये बांधत. पुरातत्वशास्त्रज्ञांना त्या काळातील दगड आणि खांबही सापडले आहेत. आजूबाजूला बाग आणि जलीय वनस्पतींच्या अस्तीत्वाचे पुरावे देखील सापडले असून जे यातून हे दर्शवतात की, तेथे राहणारे लोक किती श्रीमंत होते ते. सेप्टिक टाक्यांमध्ये आढळणारी प्राण्यांची हाडे आणि मातीची भांडी त्या काळात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैली आणि आहारासह प्राचीन रोगांवर प्रकाश टाकू शकतात.

Related Stories

No stories found.