फायझर बायोएनटेकची लस घेतल्यानंतर नॉर्वेत 29 जणांचा मृत्यू 

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

नॉर्वेत  फायझर बायोएनटेकची  लस  घेतल्यानंतर  मृत्यू  झाल्याने  चिंतेत  भर  पडली  आहे.  मृतांमध्ये  75 ते  80  वयोगटांतील  नागरिकांचा  समावेश  आहे. लस  घेतल्यानंतर  उलटी,  ताप यासारखा  त्रास  जाणवला  असल्यास  प्रथमदर्शनी  सांगण्यात  येत  आहे.

नाॅर्वे : अनेक  देशांमध्ये  कोरोना  लसींना  आपत्कालीन  वापरासाठी  परवानगी  देण्यात  आली  असताना  नॉर्वेमध्ये  कोरोनाच्या  लसीकरणाबाबत  धक्कादायक  वृत्त  समोर  आलं  आहे. कोरोना  लसीकरणाला  नॉर्वेत  सुरुवात  झाली  असून  डिसेंबर  अखेरीपासून  ते आतापर्यंत 25  हजारांहून  अधिक  लोकांना  लस  देण्यात  आली  आहे. 

मात्र  लस  घेतल्यानंतर  29 जणांचा  मृत्यू  झाला  आहे.  तर  दुसरीकडे  75  पेक्षा  अधिक  लोकांची  प्रकृती  चिंताजनक  आहे.  लसीकरण  मोहीम  राबवण्यात  येत  असताना  नॉर्वेत  फायझर बायोएनटेकची  लस  घेतल्यानंतर  मृत्यू  झाल्याने  चिंतेत  भर  पडली  आहे.  मृतांमध्ये  75 ते  80  वयोगटांतील  नागरिकांचा  समावेश  आहे. लस  घेतल्यानंतर  उलटी,  ताप यासारखा  त्रास  जाणवला  असल्यास  प्रथमदर्शनी  सांगण्यात  येत  आहे.

13  जणांचा  मृत्यू  झाला असल्याने  मृत्यू  कोणत्या कारणाने मृत्यू  झाला  याची  चौकशी करण्यात  येत  आहे.  तर  16  जणांच्या  मृत्यूचं  कारण  असल्याचे  नॉर्वे  मेडिसीन यंत्रणेकडून  सांगण्यात  आलं  आहे.

संबंधित बातम्या