अमेरिकेत नवा इतिहास..; भारतीय वंशाच्या नीरज अंतानींनी जिंकली मोठी निवडणूक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

नीरजने अमेरिकेतील राज्य ओहयोमधून सीनेटची निवडणूक जिंकली आहे. याबरोबरच ते या राज्यात निवडून येणारे पहिले भारतीय ठरले आहेत. नीरजने याबाबत ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला.

वॉशिंग्टन-  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आहे. आज निवडणुकीची मतमोजणीही सुरू आहे. ही निवडणूक फक्त रिपब्लिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट जो बाइडेन यांच्यात नसून यात अमेरिकी काँग्रेसच्या काही सदस्यांची सुद्धा निवडणूक होत आहे. यांच्यातील एक आहेत २९ वर्षीय भारतीय-अमेरिकी नीरज अंतानी जे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते. नीरज यांनी ३ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत यश मिळवत एक नवीन इतिहास रचला आहे.   

नीरजने अमेरिकेतील राज्य ओहयोमधून सीनेटची निवडणूक जिंकली आहे. याबरोबरच ते या राज्यात निवडून येणारे पहिले भारतीय ठरले आहेत. नीरजने याबाबत ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला. आपण राज्याच्या सीनेटवर निवडून आलो आहोक याबद्दल आपण कृतज्ञ राहू इच्छितो. त्यांना मतदान करणाऱ्यांचे आभारही त्यांनी या ट्वीटद्वारे मांडले आहेत. आपल्या टीमचे तसेच आपल्या समर्थकांचे आभार मानायलाही ते यावेळी विसरले नाहीत. ओहयोचा सीनेट सदस्य म्हणून काम करताना आपण लोकांसाठी, त्यांच्या अमेरिकी स्वप्नांना साकारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनतेला ट्वीमधून दिले. नीरज यांनी डेमोक्रेटीक पक्षाच्या मार्क फोगल यांना हरवले आहे. 

नीरज हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून 2014 मध्ये अवघ्या 23 वर्षांच्या वयातच ते ओहयो प्रतिनिधी सभेसाठी निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी सर्वांत कमी वयाचा खासदार होण्याची किमया साधली होती. नीरज यांचे आई-वडील 1987 मध्ये अमेरिकेत आले होते. ते काही दिवस वॉशिंग्टनमध्ये राहिले नंतर त्यांनी मियामीमध्ये वास्तव्य हलविले होते.

संबंधित बातम्या