मिठाच्या अति सेवनाने दरवर्षी ३० लाख लोकांचा मृत्यू; WHO  

Untitled design - 2021-05-09T174629.104.jpg
Untitled design - 2021-05-09T174629.104.jpg

मिठाशिवाय (Sodium)  अन्न एकदम बेचव लागते, आपण एक दिवसही मिठाशिवाय अन्नपदार्थ खाण्याचा विचारही करू शकत नाही. पण मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे दरवर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. लोकांमध्ये मीठ जास्त प्रमाणात घेतल्यास हृदय रोग आणि स्ट्रोकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ दिसून येत आहे.  हे पाहता  मिठामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी संस्थेने लोकांना दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे.  तसेच, अन्नामध्ये सोडियम सामग्री मर्यादित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (3 million people die every year due to excessive consumption of salt; WHO) 

जागतिक आरोग्य संघटनेन केलेल्या अभ्यासानुसार, आपण सर्वजण गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहोत. मानवी शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन असणे आवश्यक असते. मात्र अन्नामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यास हृदयरोग, स्ट्रोक आणि रक्तदाबाचा धोका वाढतो, इतकेच नव्हे तर,  यामुळे हाडे देखील कमजोर होतात. मात्र, आरोग्य संघटनेने जारी केलेल्या नियमावलीचे किंवा मानकांनाचे पालन केल्यास  2025 पर्यंत मीठाचा वापर 30 टक्क्यांनी कमी करू शकतो, असा दावा आरोग्य संघटनेने केला आहे. 

दररोज 9  ते 12 ग्रॅम मिठाचे सेवन प्राणघातक 
आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी अंदाजे 11 दशलक्ष लोक खराब अन्नामुळे मरतात. तर यापैकी सुमारे 30 लाख  लोक फक्त मिठाचे सेवन केल्यामुळे मरतात. पाकिटबंद पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ  प्रोसेस्ड फूड, आणि मांस यासारख्या खाद्यपदार्थ याशिवाय मसाले आणि चटपटीत पदार्थांमध्ये मिठाचे जास्त प्रमाण आढळून येते. निरोगी आरोग्यासाठी आणि निरोगी प्लाझ्मा तयार करण्यासाठी मिठाचं सेवन आवश्यक मानले जाते.  जगभरात बहुतांश लोक दररोज सरासरी 9 ते 12 ग्रॅम मिठाचे सेवन करतात. मात्र एका ठराविक पातळीवर मिठाचा वापर कमी केल्यास जागतिक पातळीवर 2.5 मिलियन मृत्यू रोखता येऊ शकतात, असे आरोग्य संघटनेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शक सूचना कोणत्या?  
सोडियम क्लोराईड हे मीठाचे रासायनिक नाव आहे आणि सोडियम हे एक खनिज आहे, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अ‍ॅड्नॉम घब्रायियस यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, खाद्यपदार्थांमधील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी  60 हून अधिक खाद्य श्रेणींमध्ये मिठाच्या पातळीसाठी ठरवलेली मानके  मदत करतील. ज्या देशांमध्ये प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात त्या ठिकाणी मिठाचे सेवन कमी करण्यासाठी या मानकांचा उपयोग होईल, असा यामागे संघटनेचा हेतू आहे.  

मिठाविषयी गैरसमज, फायदे आणि  दुष्परिणाम 
घाम आल्यानंतर मीठ जास्त प्रमाणात खावे, असा काही लोकांचा समज आहे, पण तो पूर्णपणे चूक आहे.  घाम आल्यानंतर फक्त हायड्रेशनची आवश्यकता असते. मिठाच्या जास्त सेवनाने व्यक्तीच्या शरीरातील रक्तदाब वाढू शकतो.  

त्यामुळे पाकिटबंद व प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, म्हणजेच, पाकिटबंद ब्रेड, चटपटीत किंवा नमकीन स्नॅक्स, मांस खाद्यपदार्थ आणि पनीर यासारख्या सामग्रीमधील मिठाचे प्रमाण ५ मे रोजीच प्रकाशित करण्यात आले आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार, बटाटा चिप्स, पाई आणि पेस्ट्री सारख्या खाद्यपदार्थांमध्ये आणि मांस घेताना त्यातील मिठाचे प्रमाण पाहूनच खरेदी करण्याचा सल्ला आरोग्य संघटनेने दिला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com