ट्विटरमधील तीन बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीला केला रामराम

ट्विटरचे (Twitter) सीईओ पराग अग्रवाल आणि एलन मस्क यांच्यात सुरु असलेल्या वादाचा परिणाम कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दिसू लागला आहे.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि एलन मस्क यांच्यात सुरु असलेल्या वादाचा परिणाम कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दिसू लागला आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी या वादापासून दूर राहण्यासाठी कंपनी सोडत आहेत. अहवालानुसार कंपनीचे 3 वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडून गेले आहेत. (3 Senior twitter emloyees quit amid musk agrwal tussle)

टेकक्रंच मधील एका अहवालानुसार, व्हीपी इलिया ब्राउन, ट्विटर सर्व्हिसेसच्या व्हीपी कॅटरिना लेन आणि डेटा सायन्सचे प्रमुख मॅक्स श्मीझर यांनी कंपनीतून राजीनामा दिला आहे. सध्या सुरु असलेला वाद पाहता तिघांनीही कंपनी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी सीईओ पराग अग्रवाल (ट्विटर सीईओ पराग अग्रवाल) यांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. काही काळासाठी मस्क यांनी ट्विटरचा (Twitter) करार काही काळासाठी थांबवला आहे.

Elon Musk
ट्विटर खरेदीच्या कराराला एलन मस्क यांच्याकडून स्थगिती; पराग अग्रवाल यांची माहिती

स्पॅमच्या मुद्द्यावरुन अग्रवाल आणि मस्क यांच्यात वाद झाला

नुकतेच पराग अग्रवाल आणि एलन मस्क (Elon Musk) एका फेक अकाऊंटवरुन ट्विटरच्या माध्यमातून आमनेसामने आले होते. खरं तर, स्पॅमच्या मुद्द्यावर करार ठेवण्याच्या मस्क यांच्या निर्णयानंतर, सीईओ पराग अग्रवाल यांनी स्पॅम आणि बनावट खात्यांवर त्यांचे नियंत्रण असल्याचे म्हटले होते. मात्र, मस्क यांनी पराग अग्रवाल यांच्याकडून करण्यात आलेला दावा सपशेल नाकारला. याआधी, मस्क यांनी कंपनीमधील सुधारणांबद्दल बोलले होते की, 'कंपनी सध्या ज्या दिशेने जात आहे, त्यामध्ये आणखी नव्या बदलाची आवश्यकता आहे.' त्यानंतर या गोष्टीची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मस्क पराग अग्रवाल यांना कंपनीतून हाकलून देऊ शकतात. मस्क यांनी हा करार 2022 मध्येच पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला असला तरी सध्या हा करार होल्डवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com