Pakistan Accident: गिलगिट बाल्टिस्तानमध्ये बस, कार खोल दरीत कोसळून 30 ठार

बसची कारला धडक
Pakistan Bus Accident File Photo
Pakistan Bus Accident File PhotoDainik Gomantak

Pakistan Accident: पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील गिलगिट बाल्टिस्तानमध्ये प्रवासी बस कारला धडकून खोल दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

दियामीर जिल्ह्यातील शतियाल चेकपोस्टजवळ हा अपघात झाला. ही हायस्पीड बस गिलगिटहून रावळपिंडीकडे जात होती. या बसची कारला धडक बसल्याने हा अपघात झाला.

शातियाल चौकात बस आणि कारची धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने खोल दरीत पडल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री हा अपघात घडल्याने बचावकार्यात अनेक अडचणी आल्या.

मृतदेहांची ओळख पटविण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Pakistan Bus Accident File Photo
Earthquake Zones in India: भारतात 'या' 8 राज्यांना आहे भुकंपाचा सर्वाधिक धोका... जाणून घ्या भूकंपप्रवण क्षेत्रे

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अपघातातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना सर्व उपलब्ध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये रस्ते अपघात सामान्य आहेत आणि ते मुख्यतः खराब रस्ते, खराब ॉवाहने आणि वाहन चालवण्याची पद्धत यामुळे होतात.

नुकतेच बलुचिस्तानमधील लासबेला येथे प्रवासी बस दरीत कोसळून 41 जणांचा मृत्यू झाला होता. ही बस क्वेटातून कराचीला चालली होती. पण बसचा वेग जास्त होता. त्यामुळे ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये 27,000 हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com