डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून US Capitol मध्ये हिंसाचार..चार जण ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जानेवारी 2021

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनच्या कॅपिटल हिलमध्ये हिंसाचार करत खळबळ माजवली. काल रात्री ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी शस्त्रे घेऊन कॅपिटल हिलमध्ये प्रवेश केला, तोडफोड केली, आणि सिनेटर्सला बाहेर काढून, इमारतीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला.

वॉशिंग्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांत अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसाचाराचे प्रकार दिसले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनच्या कॅपिटल हिलमध्ये हिंसाचार करत खळबळ माजवली. काल रात्री ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी शस्त्रे घेऊन कॅपिटल हिलमध्ये प्रवेश केला, तोडफोड केली, आणि सिनेटर्सला बाहेर काढून, इमारतीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. तथापि, बर्‍याच संघर्षानंतर सुरक्षा दलाने त्यांना बाहेर काढले आणि कॅपिटल हिल सुरक्षित केले. वॉशिंग्टन हिंसाचारात आतापर्यंत चार जणांच्या मृत्यू झाला आहे.

खरं तर, कॅपिटल हिलमधील एक कॉलेज प्रक्रिया सुरू होती, त्याअंतर्गत जो बायडेन यांना अधिकृतपणे व संसदिय प्रक्रियेनुसार अमेकिकेचे राष्ट्राध्क्ष घोषित केले जाणार होते. दरम्यान, ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये घूसत कॅपिटल हिलवर हल्ला केला. हे आंदोलक डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेत आणण्यासाठी पुन्हा मते मोजण्याची करण्याची मागणी करत होते. 

वॉशिंग्टनमध्ये चार जणांचा मृत्यू, आणीबाणी लागू

कॅपिटल हिलमधील कार्यवाहीच्या वेळी ट्रम्प समर्थकांनी आपला मोर्चा सुरू केला असता, गोंधळामुळे सुरक्षा वाढविण्यात आली. परंतु हे थांबले नाही आणि सर्व समर्थक कॅपिटल हिलच्या दिशेने गेले. या काळात सुरक्षा दलाने त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधुरांचा मारा केला. वॉशिंग्टन पोलिसांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी झालेल्या या हिंसाचारात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.जेव्हा संपूर्ण परिसर रिकामा झाला होता, तेव्हा ट्रम्प समर्थकांकडे बंदुकांव्यतिरिक्त इतरही धोकादायक गोष्टी होत्या. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिंसाचारानंतर सार्वजनिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. वॉशिंग्टनच्या महापौरांच्या म्हणण्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या